Arbaaz Khan Birthday: अरबाज खानशी लग्नासाठी मलायकानेच घेतला होता पुढाकार, वाचा Untold Love Story By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2022 1:46 PM1 / 9अरबाज खान आणि मलायका अरोरा या दोघांनी विवाहित आयुष्याची 19 वर्षे एकत्र घालवली आणि त्यापूर्वी दोघेही अनेक वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. मलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करते आहे तर अरबाज जॉर्जिया अँड्रियानीला. (Photo Instagram) 2 / 9अरबाज आणि मलायकाची लव्हस्टोरी एखाद्या सिनेमाच्या लव्हस्टोरी इतकीच इंटरेस्टिंग आहे. दोघांची पहिली भेट 1993मध्ये एका बोल्ड फोटोशूट दरम्यान झाली होती. (Photo Instagram) 3 / 9कॉफी ब्रँडच्या जाहिरातीचे हे फोटोशूट होते, त्याचदरम्यान ते दोघेही एकमेकांवर फिदा झाले. बघताच क्षणी दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. (Photo Instagram) 4 / 9 कॉफी फोटोशूटनंतर दोघांनी एकमेकांस डेट करण्यास सुरवात केली. पाच वर्षांच्या डेटिंगनंतर मलायकाने अरबाजला लग्नासाठी प्रपोज केले. (Photo Instagram) 5 / 9मलायकाने एका मुलाखतीत सांगितले होते की, 'आम्ही दोघांना एकाच वेळी एकमेकांबद्दल असलेली फिलिंग लक्षात आली,आम्ही लग्न केले पाहिजे असे मला वाटले. अरबाजने मला प्रपोज केले नाही. (Photo Instagram) 6 / 9 मलायकाने सांगितले की कसे तिने लग्नासाठी अरबाजला विचारले होते. पाच वर्ष डेट केल्यानंतर मी त्याला नाते पुढे नेण्यासाठी लग्न करण्यासाठी विचारले होते. त्यांनी हो म्हणायला जराही उशीर केला नाही. अरबाजने फक्त हेच म्हटलं की तारीख आणि वेळ सांग मी येईन.(Photo Instagram) 7 / 9 १२ डिसेंबर, १९९८ साली दोघांनी ख्रिश्चन आणि मुस्लिम रितीरिवाजात लग्न केले होते. (Photo Instagram) 8 / 9लग्नाच्या चार वर्षानंतर 2002मध्ये अरबाज आणि मलायकचा मुलगा अरहानचा जन्म झाला. अरहान आता बराच मोठा झाला आहे.(Photo Instagram) 9 / 9लग्नाच्या 19 वर्षानंतर मलायका-अरबाजच्या नात्यात दुरावा आला आणि २०१७ साली त्यांचा घटस्फोट झाला. या दोघांच्या घटस्फोटाविषयी ऐकून त्यांच्या कुटुंबाला आणि मित्र परिवाला धक्का बसला होता. (Photo Instagram) आणखी वाचा Subscribe to Notifications