Aryan Khan Drugs Case: २७ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर आर्यन खानची झाली अशी अवस्था, समोर आले फोटो By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 5:04 PM1 / 9ड्रग्स केसमध्ये अडकलेला बॉलिवूड अभिनेता शाहरूख खान याचा पुत्र आर्यन खान याची कोर्टाने जामीनावर मुक्तता केली आहे. सुमारे २७ दिवसांपासून तुरुंगात असलेला आर्यन खान याची आर्थर रोड कारागृहातून सुटका झाली आहे. दरम्यान, तुरुंगातून बाहेर पडतानाचा आर्यन खानचा फोटो समोर आला आहे. 2 / 9तुरुंगातून बाहेर पडताना आर्यन खानने व्हाईट टी-शर्ट आमि ब्लू जॅकेट घातले होते. आर्यन खान तुरुंगातून बाहेर पडतानाचे फोटो आता व्हायरल होत आहेत. 3 / 9जामीन देताना कोर्टाने घातलेल्या अटींनुसार आर्यन खानला दर शुक्रवारी एनसीबीच्या कार्यालयात सकाळी ११ ते २ या काळात राहावे लागेल. तसेच इतर आरोपींशी आर्यन खान कुठल्याही प्रकारे संपर्क साधू शकणार नाही. त्याशिवाय त्याला देश सोडून जाताही येणार नाही. तसेच पुराव्यांशी छेडछाड आणि ते नष्ट करण्याचा प्रयत्न करता येणार नाही. 4 / 9आर्यन खानला एक लाख रुपयांच्या हमीवर जामीन मिळाला आहे. कोर्टाने आर्यन खानला पासपोर्ट जमा करावा लागेल. तसेच त्याला परवानगीशिवाय मुंबईबाहेरही जाता येणार नाही. एसीबीकडून परवानगी घेऊन तो बाहेर जाऊ शकेल. 5 / 9आर्यन खानसोबत अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांनाही जामीन मिळाला आहे. आर्यन खानला २ ऑक्टोबर २०२१ रोजी एनसीबीने क्रूझ ड्रग्स पार्टीमधून अटक केली होती. 6 / 9एनसीबीने आर्यन खानची काही दिवस चौकशी केली होती. या चौकशीमधून अजून काही लोकांची नावे पुढे आली होती. तसेच अनन्या पांडे हीसुद्धा एनसीबीच्या रडारवर आहे. 7 / 9आर्यन खानचा खटला आधी सत्र न्यायालयात सुरू होता. तिथे त्याला जामीन अर्ज नाकारल्यानंतर आर्यन खानची लिगल टीम मुंबई उच्च न्यायालयात गेली होती. तिथून त्याला दिलासा मिळाला. 8 / 9आर्यन खान तुरुंगात असताना शाहरुख खान आणि गौरी खान प्रचंड तणावाखाली होते. 9 / 9दरम्यान २८ ऑक्टोबर हा दिवस शाहरूख आणि गौरीसाठी दिलासा देणारा ठरला. त्यादिवशी शाहरुखचे लीगल टीमसोबतचे फोटो व्हायरल झाले होते. त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते. आणखी वाचा Subscribe to Notifications