आता तू म्हातारी झालीस... म्हणत डिवचणा-या ट्रोलर्सला आशा नेगीने असे दिले उत्तर

By रूपाली मुधोळकर | Published: September 29, 2020 07:05 PM2020-09-29T19:05:21+5:302020-09-29T19:25:22+5:30

दिला कायदेशीर कारवाईचा इशारा

‘पवित्र रिश्ता’ या प्रसिद्ध टीव्ही मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री आशा नेगी ट्रोलर्सवर जाम भडकली.

होय, आशाने नुकताच तिचा एक फोटो शेअर केला आणि या फोटोनंतर काही युजर्सनी तिला ट्रोल करणे सुरु केले.

आशाने एका जुन्या घरासमोर काढलेला फोटो शेअर केला. तिचा हा फोटो काही नेटक-्यांना आवडला नाही. बुड्ढी हो गई शादी कर लो याऱ़़ तुमसे दीवार (फोटोतील भिंत) जवान है, अशा आशयाच्या कमेंट काही युजर्सनी केल्या.

हा या कमेंट पाहून आशा नेगी संतापली नसेल तर नवल, म्हातारी म्हणून डिवचणा-या या युजरला आशाने चांगलेच प्रत्युत्तर दिले.

‘या विनोदाला मी १०० गुण देते, पण तुमच्या विचारांचे काय करायचं? ही केस सायबर बुलिंगची देखील होऊ शकते,’अशा शब्दांत तिने ट्रोल करणा-याची बोलती बंद केली.

आशाच्या या कमेंटवर अनेक सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिल्या, ‘ज्याने लिहिले त्याची बुद्धी म्हातारी झालीय,’ असे किश्वर मर्चंटने लिहिले. तर ‘यांना मोठी चिंता,’ अशी प्रतिक्रिया अमृता खानविलकरने दिली.

आशा नेगीने ‘सपनों से भरे नैना’ या मालिकेतून अ‍ॅक्टिंग करिअर सुरु केले होते.

त्यानंतर तिने हिटलर दिदी, कबूल है, जमाई राजा यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले.

पवित्र रिश्ता आणि बडे अच्छे लगते है या दोन मालिकांमुळे ती घराघरांत पोहोचली.

‘लुडो’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यु केला होता.

अलीकडे ‘बारीश’ या वेब सीरिजमध्ये देखील ती झळकली होती. या सीरिजमध्ये तिने शर्मन जोशीसोबत स्क्रिन शेअर केली होती.

टीव्ही मालिका 'पवित्र रिश्ता' या मालिकेने सर्वांची मने जिंकली होती. या मालिकेतील अंकिता लोखंडे व सुशांत सिंग राजपूत प्रचंड लोकप्रिय झाली होती. सोबतच रित्विक धनजानी व आशा यांची जोडीही गाजली होती.

'पवित्र रिश्ता'च्या सेटवरच रित्विक व आशा एकमेकांच्या प्रेमात पडले होते. तेव्हापासून हे कपल एकमेकांसोबत होते. मात्र आता या नात्यात बिनसल्याचे कळतेय.