PHOTOS : गर्लफ्रेन्ड अथिया शेट्टीच्या नव्या फोटोंवर KL फिदा, अशी केली कमेंट...! By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 4:34 PM1 / 8बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टी व क्रिकेटपटू के. एल. राहुल एकमेकांच्या प्रेमात आहेत, हे आता कुणापासूनही लपून राहिलेलं नाही. हे कपल लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.2 / 8 हे कपलं अनेकदा एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करताना दिसतं. आता अथियाने नवे फोटो शेअर केले आहेत आणि यावर केएलने केलेली कमेंट चर्चेत आहे.3 / 8एका आय वेअर ब्रँडच्या प्रमोशनसाठी अथियाने नुकतंच एक फोटोशूट केलं. यात अथिया वेगवेगळ्या फ्रेमचे चष्मे लावून स्टायलिश पोझ देताना दिसतेय.4 / 8अथियाच्या या फोटोवर केएलने हार्ट व फायर इमोजी पोस्ट करत, आपलं प्रेम व्यक्त केलं आहे. केएल शिवाय सान्या मल्होत्रा, रिया कपूर, हार्दिक पांड्या आदींपी अथियाच्या फोटोंवर कमेंट केली आहे.5 / 8अथिया व केएल दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. सुरूवातीला अथिया व केएल यांच्यापैकी कुणीही अधिकृतपणे या नात्याची कबुली दिली नव्हती. पण डेटींगच्या चर्चेला हवा देण्याचं काम मात्र त्यांनी न चुकता केलं होतं.6 / 8 दोघांचे एकत्र फोटो शेअर करणं, एकत्र बाहेर फिरणं, एक दुस-यांचे फोटो शेअर करत त्यावर क्यूट कमेंट करणं यामुळे दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. 7 / 8चर्चा खरी मानाल तर अथिया व राहुल 2023 मध्ये लग्न करणार आहेत. जानेवारी महिन्यात हे कपल लग्नबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे.8 / 8अथिया शेट्टी हिने ‘हिरो’या चित्रपटातून डेब्यू केला. पण हा चित्रपट दणकून आपटला. अनीस अज्मीच्या ‘मुबारकां’मध्ये अथियाला दुसरी संधी मिळाली. पण हा चित्रपटही फ्लॉप ठरला. ‘मोतीचूर चकनाचूर’ हा तिचा तिसरा सिनेमाही सुपरडुपर फ्लॉप झाला. आणखी वाचा Subscribe to Notifications