Join us

Avatar: The Way of Water : 'अवतार २' चं आभासी जग दिग्दर्शकाच्या नजरेतुन बघा ! आधुनिक तंत्रज्ञनाचा पुरेपुर वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2022 9:35 AM

1 / 8
मोशन कॅप्चर : अवतार मधील पात्र हे व्हर्चुअल आहेत. पण त्यांच्या चेहऱ्यावर खरे मानवी हावभाव दिसावेत म्हणून कॅमेरुन यांनी मोशन कॅप्चरच्या हेड गिअरच्या समोर एक छोटा HD कॅमेरा लावला जो अॅक्टर्सचे हावभाव रेकॉर्ड करत होता.
2 / 8
हेडगिअर सोबत लावलेल्या कॅमेऱ्याचा फायदा हा झाला की अॅक्टर्सच्या चेहऱ्यावर माणसाासारखेच राग, आनंद, दु:ख या भावना स्पष्ट दिसत होत्या.
3 / 8
नॉर्मल मोशन कॅप्चरचा वापर सगळ्याच चित्रपटांसाठी केला जातो. मात्र कॅमेरुन यांनी 'द वॉल्युम' या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. मार्कर लीड करण्यासाठी फोटोत १२० स्टेशनरी कॅमेऱ्यांचा वापर केला असल्याची माहिती आहे
4 / 8
शूट करताना HD कॅमेऱ्याने फिजिकल फुटेज सुद्धा शूट केली जाते. मोशन कॅप्चर सोबत ग्राफिकला स्क्रीनवर आणण्यासाठी फिजीकल फुटेजचा फायदा होतो.
5 / 8
कॅमेरुन एक खास व्हर्चुअल कॅमेऱ्याचाही वापर करतात जो अॅनिमेशन स्क्रीन वर आणण्यासाठी उपयोगी ठरतो.
6 / 8
शूटसाठी कॅमेरुन यांनी फ्युजन ३डी कॅमेऱ्याचाही वापर केला आहे. यामध्ये उभा आणि आडवा असे दोन F 90 कॅमेरे असतात जे आपल्या डोळ्यांसारखेच दोन वेगवेगळे व्हिजन रेकॉर्ड करतात.
7 / 8
शूट करताना ते व्हर्चुअली कसे दिसेल हे बघण्यासाठी कॅमेरुन स्विंग कॅमेऱ्याचा वापर करतात. ट्रेडिशनल CGI मध्ये ग्रीन स्क्रीनवर आर्टिस्टची हालचाल रेकॉर्ड केली जाते.त्याला डिजीटली फिट केले जाते. आर्टिस्टमुसार कॅमेरा अॅडजस्ट केला जातो. म्हणून अवतार इतर ३डी पेक्षा जास्त खरीखुरी वाटते.
8 / 8
शूटिंग करताना हॉलिवुड अभिनेत्री केट विन्स्लेटने तर रेकॉर्डच बनवला. तिने तब्बल ७ मिनिट १४ सेकंद श्वास रोखून धरला. यासह तिने टॉम क्रुझचा रेकॉर्ड मोडला. मिशन इंपॉसिबल शूटच्या वेळी टॉम क्रुझने ६ मिनिटे श्वास रोखून धरला होता.
टॅग्स :सिनेमाइंग्रजीहॉलिवूड