ऐश्वर्या नारकरच्या लेकाला कधी पाहिलंय? आईइतकाच दिसतो देखणा By ऑनलाइन लोकमत | Published: March 07, 2022 10:48 AM1 / 12मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर. वय हा केवळ आकडा असतो हे ऐश्वर्या नारकर यांच्याकडे पाहिल्यावर कळतं.2 / 12वयाची ५० वर्ष पार केल्यानंतरही त्यांनी त्यांचा फिटनेस जपला आहे. त्यामुळे त्यांचं सौंदर्य आणि फिटनेस पाहून अनेक तरुण अभिनेत्री त्यांच्यासमोर फिक्या पडतात.3 / 12सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या ऐश्वर्या नारकर कायम त्यांचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असतात.4 / 12कधी साडीमध्ये तर कधी वेस्टर्न आऊटफिटमध्ये फोटो शेअर करुन त्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात.5 / 12ऐश्वर्या यांच्याप्रमाणेच त्यांचे पती अविनाश नारकरदेखील मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहेत. 6 / 12अनेक चित्रपटांमध्ये ऐश्वर्या आणि अविनाश या दोघांनीही एकत्र काम केलं आहे.7 / 12ऐश्वर्या आणि अविनाश यांच्या करिअरविषयी सगळ्यांनाच ठावूक आहे. मात्र, त्यांच्या पर्सनल लाइफविषयी फार मोजक्या जणांना माहित आहे.8 / 12ऐश्वर्या नारकर यांना एक मुलगादेखील आहे. मात्र, तो कलाविश्वापासून दूर असल्याचं सांगण्यात येतं.9 / 12त्यांच्या मुलाचे नाव अमेय नारकर असून तो आई-वडिलांइतकाच दिसायला सुंदर आहे.10 / 12अमेय सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय आहे. त्यामुळे अनेकदा तो त्याचे फोटो शेअर करत असतो.11 / 12आईप्रमाणेच अमेयलादेखील फोटोशूटची आवड असल्याचं दिसून येतं.12 / 12नारकर कुटुंबाचा सुंदर फॅमिली फोटो आणखी वाचा Subscribe to Notifications