कोण आहे शाल्मली खोलगडेचा नवरा फरहान शेख? जाणून घ्या त्याच्याविषयी By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2021 11:13 AM1 / 9आपल्या सुमधूर आवाजाने कानसेनांना तृप्त करणारी लोकप्रिय गायिका म्हणजे शाल्मली खोलगडे (Shalmali Kholgade). आजवरच्या कारकिर्दीत शाल्मलीने अनेक गाण्यांना आपला आवाज दिला आहे.2 / 9शाल्मलीची 'बलम पिचकारी', 'लत लग गई' अशी अनेक गाणी सुपरहिट ठरली आहेत. त्यामुळे आज तिचा अफाट मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतं.3 / 9अलिकडेच शाल्मलीने चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला. शाल्मलीने नुकतीच तिच्या प्रियकरासोबत लग्न केलं आहे.4 / 9२२ नोव्हेंबर रोजी शाल्मलीने लग्न केलं असून या लग्नसोहळ्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले. सोबतच अखेर लग्नबंधनात अडकल्याचं जाहीर केलं. 5 / 9शाल्मलीने तिचा प्रियकर फरहान शेखसोबत लग्नगाठ बांधली आहे. विशेष म्हणजे या दोघांनी कोणताही गाजावाज न करता साध्या पद्धतीने लग्न केलं.6 / 9शाल्मलीच्या लग्नाची माहिती समोर आल्यानंतर अनेकांना तिचा प्रियकराविषयी फरहान शेखविषयी जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. 7 / 9सध्या सोशल मीडियावर फरहान शेख कोण हा एकच प्रश्न चर्चेत आला आहे.8 / 9शाल्मली आणि फरहान या दोघांनी जवळपास ६ वर्ष एकमेकांना डेट केलं आणि त्यानंतर लग्नाचा निर्णय घेतला.9 / 9फरहानदेखील संगीत क्षेत्राशी निगडीत असून तो Sound Engineer आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications