आरशात पाहिल्यावर स्वतःचा तिरस्कार वाटायचा; या कारणामुळे रोज रडायची अविका गौर By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2021 3:37 PM1 / 9 'बालिका वधू'नंतर अविका गौर 'सिमरन' मालिकेत झळकली आणि त्यानंतर तिने ब्रेक घेतला. 2 / 9मध्यंतरी तिचे वजनही अतिशय वाढले होते. त्यामुळे वर्कआऊट करत, योग्य डाएट फॉलो करत तिने वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवले. 3 / 9वजन कमी करण्यासाठी तिला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. कारण फॅट टू फिट होण्यापर्यंतचा तिचा प्रवासही सोपा नव्हता. 4 / 9आता दिसणारी अविका आणि पूर्वीची अविका यांच्यात जमीन आस्मानाचा फरक तुम्हाला पाहायला मिळेल.5 / 9पूर्वी ती खूप लठ्ठ होती, त्यामुळे तिच्या लूकमध्ये फरक पडला होता. 6 / 9स्वतःला आरशात पाहणेही ती पसंत करत नव्हती. 7 / 9इतका स्वतःचा तिरस्कार करायला लागली होती. 8 / 9मात्र प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर अविकाने अशक्य ते शक्य करून दाखवले. 9 / 9विविध फोटोंमध्ये तिचा ग्लॅमरस अंदाज पाहून चाहते फिदा होतात. आणखी वाचा Subscribe to Notifications