बॉयफ्रेन्डच्या चर्चेवर पहिल्यांदाच बोलली 'बालिका वधू' फेम अविका गौर, म्हणाली - तो माझा... By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2022 1:34 PM1 / 12‘बालिका वधू’ अविका गौर लवकरच ‘10th Class Diaries’ या चित्रपटात झळकणार आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे.2 / 1210th Class Diaries हा एक तेलगू सिनेमा आहे आणि यात अविका लीड रोलमध्ये आहे. अविका या चित्रपटाची प्रोड्यूसरही आहे. येत्या 24 मार्चला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.3 / 12सोशल मीडियावर अविका या चित्रपटाचं धडाक्यात प्रमोशन करतेय. रोज नवे ग्लॅमरस फोटो आणि सोबत सिनेमाचं प्रमोशन असं तिचं सुरु आहे.4 / 12आधीपेक्षा अविका आता चांगलीच स्लिम दिसू लागलीये. तिचा ग्लॅमरस अवतार पाहून सगळेच तिच्यावर फिदा आहेत.5 / 12तूर्तास अविकाचं नाव साऊथ अभिनेता राज थरून सोबत जोडलं जातेय. अविकाने राजसोबत दोन सिनेमात काम केलंय आणि साहजिकच तिच्या व त्याच्या नावाची चर्चा आहे.6 / 12एका ताज्या मुलाखतीत अविकाला याबद्दल छेडलं असता, तिला हसू आवरलं नाही. राज माझा फक्त चांगला मित्र आहे. मी हैदराबादेत जाते तेव्हा त्याला नक्की भेटते, असं ती म्हणाली.7 / 12राज व माझ्या अफेअरच्या अफवा माझ्याही कानावर आल्या. खरं सांगू तर अशा अफवा ऐकून मज्जा येते. माझं नावही चर्चेत येतं, असं ती हसत हसत म्हणाली.8 / 12अविका सध्या नागा चैतन्य स्टारर ‘थँक यू’ या सिनेमाचं शूटींग करतेय. यात अविका सपोर्टिंग रोलमध्ये दिसणार आहे.9 / 12‘बालिका वधु’ मालिकेमुळे आजही अविका छोटी आनंदी म्हणूनच जास्त ओळखली जाते. या मालिकनंतर ती ससुराल सिमर का, झलक दिखलाजा, फियर फॅक्टर- खतरों के खिलाड़ी या रिअॅलिटी शोमध्येही सहभागी झाली होती. 10 / 12करिअरमध्ये अविकाला वाढत्या वजनामुळे अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत होतं. अखेर, फॅट टू फिट चॅलेंज स्वीकारत अविकाने आपलं ट्रान्सफॉर्मेशन करुन घेतलं. त्यानंतर अविकाचा सडसडीत बांधा पाहून सगळेच चकित झाले होते.11 / 12काही वर्षांपूर्वी अविका गौर आणि तिचा सहकलाकार मनिष रायसिंघन यांच्या अफेअरच्या अफवा उडाल्या होत्या. अगदी अविका मनिष रायसिंघनच्या मुलाची आई होणार, अशी अफवाही पसरली होती. 12 / 12अविकाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तिला तिच्या स्वप्नातल्या राजकुमार मिळाल्याची कबुली दिली होती. सध्या अविका टीव्ही शो ‘रोडिज’ फेम मिलिंद चंदवानीला डेट करतेय. आणखी वाचा Subscribe to Notifications