'बालिका वधू' फेम अभिनेत्री १३ वर्षांनी करतेय कमबॅक, दोनच वर्षांपूर्वी दिला मुलीला जन्म
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2025 13:33 IST
1 / 8२००८ साली आलेली 'बालिका वधू' (Balika Vadhu) मालिका खूप गाजली. अभिनेत्री अविका गौरने मालिकेत छोट्या आनंदीची भूमिका साकारली होती. तसंच मालिकेतील जगदीश, दादी सा, सुगना, गहना सारखे सर्व पात्र गाजले.2 / 8मालिकेत जगदीशच्या काकांचं लग्न त्यांच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या गहना या मुलीसोबत होतं. अभिनेत्री नेहा मर्दाने (Neha Marda) गहनाची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांनी तिला या भूमिकेत खूप पसंत केलं होतं.3 / 8अभिनेत्री नेहा मर्दा आता १३ वर्षांनी कामावर परतली आहे. मधल्या काळात नेहा नक्की कुठे होती आणि काय करत होती जाणून घेऊया.4 / 8नेहा बऱ्याच वर्षांपासून पडद्यावरुन गायब आहे. मात्र ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह होती. आता तिने कमबॅकची घोषणा केली आहे.5 / 8तिने एक व्हिडिओ शेअर केला असून यात ती ऑडिशन देताना दिसत आहे. तसंच इतक्या वर्षांनी कॅमेऱ्यासमोर उभं राहून तिने आनंद व्यक्त केला आहे.6 / 8नेहाने २०१२ साली आयुषमान अग्रवालसोबत लग्न केलं. नंतर ती पटनाला शिफ्ट झाली. नेहा काही वेळा मुंबई तर काही वेळा पटनामध्ये असायची.7 / 8मूल होण्यासाठी नेहाने खूप प्रयत्न केले आणि लग्नानंतर १० वर्षांनी नेहाला मुलगी झाली. २०२२ साली अनायराचा जन्म झाला. 8 / 8लेकीच्या जन्मानंतर नेहाच्या वजनात खूप वाढ झाली होती. डाएट आणि व्यायाम करुन आता तिने वजन नियंत्रणात आणलं आहे. नेहा आता पुढे कोणत्या प्रोजेक्टमध्ये दिसणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.