Join us

पती-पत्नी और वो! पतीच्या विवाहबाह्य संबंधामुळे मोडतोय अभिनेत्रीचा 15 वर्षांचा सुखी संसार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 5:12 PM

1 / 10
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कपलपैकी एक असलेल्या बरखा बिष्ट आणि इंद्रनील सेनगुप्ता लग्नाच्या १३ वर्षानंतर वेगळे झाले आहेत. (फोटो इन्स्टाग्राम)
2 / 10
दोन वर्षांनंतर अखेर बरखाने इंद्रनीलसोबत घटस्फोटावर आपले मौन सोडले आहे. बरखाने सांगितले की, ती आपली मुलगी मीराला सिंगल मदर म्हणून वाढवत आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
3 / 10
नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत, बरखा बिष्टने इंद्रनीलसोबतच्या घटस्फोटावर भाष्य केलं आहे. अभिनेत्री म्हणाली, “हो, ते लवकरच घटस्फोट घेणार आहेत. हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णयांपैकी एक आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
4 / 10
आपल्या 11 वर्षांच्या मुलीसोबत आयुष्यात पुढे जाताना बरखा म्हणाली, “मी सिंगल मदर आहे आणि मीरा ही माझी प्रायोरिटी आहे. मी OTT वर चांगले काम करत आहे. मी टीव्ही आणि चित्रपटांमधील चांगल्या प्रोजेक्टसाठी नेहमीच तयार असतो. (फोटो इन्स्टाग्राम)
5 / 10
अद्याप बरखा तिच्या आणि इंद्रनीलच्या विभक्त होण्यामागचे कारण काय आहे याचा खुलासा केलेला नाही. याचे कारण सांगण्यासही तिने स्पष्टपणे नकार दिला आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
6 / 10
अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात होते की इंद्रनीलचे बंगाली अभिनेत्रीसोबत विवाहबाह्य संबंध होते, ज्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. (फोटो इन्स्टाग्राम)
7 / 10
इंद्रनील बंगाली अभिनेत्री ईशा साहाला डेट करत असल्याची चर्चा होती. इंद्रनील आणि ईशाने कित्येक बंगाली चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. (फोटो इन्स्टाग्राम)
8 / 10
एक काळ असा होता की बरखा आणि इंद्रनील हे टीव्हीचे आवडते जोडपे होते. ते 2006 मध्ये 'प्यार के दो नाम... एक राधा एक श्याम' च्या सेटवर भेटले होते. (फोटो इन्स्टाग्राम)
9 / 10
एकत्र काम करत असताना ते एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर काही काळ डेट केल्यानंतर दोघांनी 2008 मध्ये लग्न केले. (फोटो इन्स्टाग्राम)
10 / 10
जून 2021 मध्ये इंद्रनील आणि बरखाच्या विभक्त झाल्याची बातमी समोर आल्याने त्याच्या चाहत्यांना धक्का बसला होता.
टॅग्स :टिव्ही कलाकारघटस्फोट