Join us

सैफच्या 'या' गोष्टीमुळे अमृता सिंगला नको होतं मूल; मुलाखतीत स्वत: केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2021 3:15 PM

1 / 8
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा घटस्फोट होऊन आज कित्येक वर्ष लोटली आहेत. मात्र, तरीदेखील नेटकऱ्यांमध्ये ही जोडी कायम चर्चेत असते.
2 / 8
१९९१ मध्ये लव्ह मॅरेज करणाऱ्या या जोडीने जवळपास १३ वर्ष संसार केल्यानंतर विभक्त होण्याचा निर्णय घेतला. या जोडीच्या घटस्फोटोमागे अनेक कारणे असल्याचं सांगण्यात येतं.
3 / 8
सैफ आणि अमृताने ज्यावेळी घटस्फोटाचा निर्णय घेतला त्यावेळी सारा अली खान १० तर इब्राहिम ४ वर्षांचा होता.
4 / 8
सैफ-अमृताची लेक सारा अली खान कलाविश्वात सक्रीय असून अनेकदा ती आपल्या आई-वडिलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. यात खासकरुन तिचे आई अमृतासोबतचे फोटो जास्त असतात.
5 / 8
आज अमृता जरी आपल्या मुलांसोबत एकत्र राहत असली तरीदेखील एकेकाळी तिला मूल नको होतं, हे तुम्हाला माहित आहे का? अनेकांना ही गोष्ट ठावूक नसेल. मात्र, एका मुलाखतीत अमृताने स्वत: याविषयी खुलासा केला.
6 / 8
लग्नानंतर चार वर्ष अमृता मूल होण्यास टाळाटाळ करत होती. मात्र, त्यामागे सैफ कारणीभूत असल्याचं तिने सांगितलं. सैफसाठीच तिने मूल न होऊ देण्याचा निर्णय घेतला होता.
7 / 8
सैफ आणि अमृताने ज्यावेळी लग्न केलं. त्यावेळी सैफ बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करत होता. या स्ट्रगलिंगच्या काळात त्याच्यावर मुलांची, घराची जबाबदारी पडू नये यासाठी अमृताने मूल न होण्याचा निर्णय घेतला होता.
8 / 8
'सैफच्या करिअरसाठी मला मुलं होऊ द्यायची नव्हती. तो त्या काळी स्ट्रगल करत होता. त्यामुळे अशात त्याच्यावर मुलांची जबाबदारी मला टाकायची नव्हती', असं अमृता म्हणाली.
टॅग्स :सैफ अली खान अमृता सिंगसेलिब्रिटीबॉलिवूडसारा अली खानसिनेमा