Join us

अल्लू अर्जून ते रामचरण! महेश बाबूपूर्वी 'या' साऊथ स्टारनेही केलंय बॉलिवूडविषयी भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 6:02 PM

1 / 12
काही दिवसांपूर्वी साऊथ स्टार महेश बाबू याने बॉलिवूडविषयी वादग्रस्त वक्तव्य करत नव्या चर्चांना वाच्या फोडली. 'बॉलिवूडला मी परवडणार नाही', असं महेश बाबू म्हणाला. त्याच्या या वक्तव्यावर बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी त्याला ट्रोल केलं. तर, काहींनी त्याला पाठिंबा दिला.
2 / 12
यामध्येच साऊथ मध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांनी महेश बाबूपूर्वी अशीच काही विधानं केली आहेत. हे कलाकार कोणते ते पाहुयात.
3 / 12
प्रियामणि - दाक्षिणात्य कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रियामणि. चेन्नई एक्स्प्रेसच्या ‘लेट्स ऑन द डांस फ्लोर’ आणि ‘द फॅमिली मॅन’ या वेब सीरिजमध्ये झळकलेली प्रियामणिने बॉलिवूडविषयी भाष्य केलं होतं.
4 / 12
'आता कुठे साऊथ स्टार लोकप्रिय होऊ लागले आहेत. त्यांच्या टॅलेंटकडे लक्ष दिलं जात आहे. एक काळ असा होता ज्यावेळी श्रीदेवी, रेखा, हेमा मालिनी आणि वैजयंतीमाला या बॉलिवूडवर राज्य करत होत्या. परंतु, त्यांच्यानंतर साऊथचा असा कोणताच कलाकार उदयास आला नाही. बॉलिवूडमध्ये आम्ही अशा लोकांना पाहिलंय ज्यांना असं वाटतं की, साऊथच्या लोकांना हिंदी बिल्कूल येत नाही. त्यामुळे ते आमच्या भाषेची खिल्ली उडवतात. यात अनेकदा ते अइयो, कैसा जी, क्या बोलता जी, असं म्हणून मस्करी करतात', असं प्रियामणि म्हणाली होती.
5 / 12
श्रुती हासन - दाक्षिणात्य सुपरस्टार कमल हासन यांची लेक श्रुती हासन हिने बॉलिवूडमध्ये गेल्यानंतर आऊटसाइडर असल्याचा फिल येतो असं म्हटलं होतं.
6 / 12
'मला बॉलिवूडमध्ये कायम आऊटसाइडर असल्यासारखं वाटतं. या ठिकाणी कायम नॉर्थ आणि साऊथ यावर चर्चा होते. समजा मी एकाच वेळी तीन तेलुगु आणि तमिळ चित्रपटात काम करतीये तर ते लोक म्हणतात की तुझं हिंदीवर लक्ष नाही. जसं काय देशात फक्त ही एकच इंडस्ट्री आहे.'
7 / 12
यश - एकदा केजीएफ स्टारला एका अभिनेता सलमान खानने एक प्रश्न विचारला होता की, साऊथचे सिनेमा बॉलिवूडमध्ये कसं काम करतायेत? त्यावर यशने खरं खरं उत्तर दिलं होतं.
8 / 12
'सुरुवातीच्या काळात साऊथ चित्रपटांना फारशी लोकप्रियता मिळाली नाही. परंतु, आता त्याच बॉलिवूडमध्ये साऊथ सिनेमांचे रिमेक होऊ लागले आहेत. ज्यामुळे आता लोकांनाही साऊथ सिनेमांविषयी समजू लागलं आहे. पण हे सगळं एका रात्रीत घडलेलं नाही. त्यासाठी अनेक वर्ष लागली आहेत', असं यश म्हणाला.
9 / 12
अल्लू अर्जुन - पुष्पा या चित्रपटातून विशेष लोकप्रिय झालेला दाक्षिणात्य सुपरस्टार म्हणजे अल्लू अर्जुन. साऊथमध्ये विशेष लोकप्रिय असलेल्या या अभिनेत्याने बॉलिवूडमध्येही आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. मात्र, तरीदेखील त्याला ही इंडस्ट्री परकी वाटते. आतापर्यंत त्याला बॉलिवूडमधील अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळाल्या आहेत. याविषयी तो एकदा व्यक्त झाला होता.
10 / 12
'कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी हिंमत आणि जोखीम घेण्याची तयारी हवी. ज्यावेळी आपण आपल्या चित्रपटात हिरोचा रोल करत असतो. त्यावेळी सगळे जण तुमच्याकडे त्याच रोलसाठी विचारणा करण्यासाठी येतात. आणि, मलाही तो रोल सोडून अन्य रोल करण्यात रस नाही. तसंही कोणत्याही हिरोला अन्य चित्रपटात साईड हिरोचं काम करायला आवडणार नाही. त्यामुळे त्याला मेन लीड रोलमध्ये काम करणंच जास्त आवडेल. '
11 / 12
राम चरण - साऊथ स्टार राम चरणने जंजीर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. परंतु, हा चित्रपट फारसा यशस्वी ठरला नाही. याविषयी त्याने एक वक्तव्य केलं होतं.
12 / 12
'मला असं वाटतं की बॉलिवूड दिग्दर्शकांनी असे चित्रपट करावेत ज्यात साऊथचाही विचार केलेला असावा. सलमानने म्हटलं होतं की, साऊथमध्ये बॉलिवूड चित्रपट का चालत नाहीत? तर मला वाटतं त्यामागचं कारण म्हणजे लिखाण आहे. डायरेक्टरच सगळ्या सीमा पार करत असतात. प्रत्येक दिग्दर्शक, लेखकाने विजयेंद्र प्रसाद आणि राजामौली यांच्याप्रमाणेच चित्रपट तयार केले पाहिजेत. मला असा एक चित्रपट करायचा आहे ज्यात मी बॉलिवूडसहदेखील काम करु शकेन.'
टॅग्स :Tollywoodबॉलिवूडसेलिब्रिटीसिनेमाअल्लू अर्जुनश्रुती हसनमहेश बाबू