Join us

सागरिकाच्या आधी झहीर खान होता 'तिच्या' प्रेमात; ८ वर्ष टिकलं नातं अन् आता ती जगतेय सिंगल मदरचं आयुष्य

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2023 4:46 PM

1 / 10
भारताचा माजी गोलंदाज झहीर खान याने चक दे फेम अभिनेत्री सागरिका घाटगेशी लग्नं केलं. दोघांचा सुखी संसार सुरू आहे. पण, सागरिकाशी भेट होण्यापूर्वी भारतीय गोलंदाज बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडला होता आणि ८ वर्ष हे नातं टिकलं होतं.
2 / 10
ईशा शर्वानी ८ वर्ष भारतीय क्रिकेटर झहीर खानसोबत रिलेशनशिपमध्ये होती. पण, या दोघांनीही ते रिलेशनशिपमध्ये असल्याचे मान्य केले नाही. दोघेही अनेकदा पार्टी आणि इव्हेंटमध्ये एकमेकांसोबत दिसले. हे दोघे पहिल्यांदाच भारतीय क्रिकेट संघाच्या कार्यक्रमात भेटले होते, जिथे ईशाने तिचा डान्स परफॉर्मन्स दिला होता.
3 / 10
इथूनच दोघांची ओळख झाली, नंतर मैत्री झाली आणि या नात्याचं रुपांतर प्रेमात झालं, असं सांगण्यात येत होतं. दोघंही लग्न करणार होते, परंतु २०१२ मध्ये दोघांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. ईशाने तिच्या फिल्मी करिअरबद्दल कधीच विचार केला नव्हता.
4 / 10
डान्स करताना सुभाष घईच्या नजरेत ईशाची पडली आणि त्यांनी ऑडिशनशिवाय तिला 'किस्ना' (2005) चित्रपटासाठी निवडले. ईशा हृतिक रोशनच्या 'हाइड अँड सीक' या व्यावसायिक जाहिरातीत त्याच्यासोबत डान्स पार्टनर म्हणून दिसली, ज्यासाठी तिला खूप प्रशंसा मिळाली.
5 / 10
ईशाने 'दरवाजा बंद रखो', 'यू मी और हम', 'लकी बाय चान्स', 'करीब करीब सिंगल' असे आणखी काही चित्रपट केले. याशिवाय तिने काही तामिळ आणि मल्याळम चित्रपटही केले. २०१२ मध्ये, ईशा 'झलक दिखला जा 5' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये देखील दिसली आणि पायाच्या दुखापतीमुळे तिला टॉप 3 मध्ये असतानाही सोडावे लागले.
6 / 10
ईशा सध्या तिचा मुलगा लुका याला सिंगल मदर म्हणून वाढवत आहे. ईशा अनेकदा इन्स्टाग्रामवर तिच्या मुलासोबत काहीतरी पोस्ट करत असते. १९८४ मध्ये गुजरातमध्ये ईशाचा जन्म झाला. वयाच्या १३व्या वर्षापासून ईशाने नृत्याचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली.
7 / 10
ईशाने कलारीपयट्टू, कथ्थक, छाऊ नृत्य अशा विविध नृत्य प्रकारांमध्ये प्रभुत्व मिळवले आहे. ईशाने मलकम नृत्याचे प्रशिक्षणही घेतले आहे. ईशाचे वडील देव इसारो हे ऑस्ट्रेलियन ख्रिश्चन कुटुंबात वाढले आणि नंतर थायलंडमध्ये बौद्ध भिक्षू बनले. त्यानंतर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत धृपद शिकण्यासाठी ते भारतात आले. येथे येताना त्यांनी गुजरातमध्ये राहणाऱ्या भारतीय शास्त्रीय गायिका दक्षा सेठ यांची भेट घेतली.
8 / 10
ईशाला एक भाऊ ताओ इसारो देखील आहे. ईशा सध्या तिच्या मुलासोबत ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे राहते.
9 / 10
10 / 10
टॅग्स :झहीर खानसागरिका घाटगे