Join us

मराठी बोलता येत असल्यानेच चित्रपटात काम करायला मिळाले, जितेंद्र यांनी सांगितल्या गिरगावातील आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 6:51 PM

1 / 7
जितेंद्र यांनी परिचय, तोहफा, हिम्मतवाला असेे एकापेक्षा एक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत.
2 / 7
जितेंद्र हे पंजाबी असले तरी ते खूप चांगले मराठी बोलतात. मला मराठी येत असल्यानेच चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली असे त्यांनी नुकतेच सांगितले.
3 / 7
जितेंद्र यांनी नुकतीच इंडियन आयडल या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्यांनी गिरगावातील त्यांच्या जुन्या घराच्या आठवणींविषयी सांगितले.
4 / 7
जितेंद्र यांच्यासोबत त्यांची मुलगी निर्माती एकता कपूरदेखील उपस्थित होती. गिरगावात राहात असताना संपूर्ण चाळीत पहिला पंखा आणि ट्युबलाईट आमच्या घरी आली होती अशी जितेंद्र यांनी आठवण सांगितली. आमचा पंखा बघण्यासाठी चाळीतील लोकांनी गर्दी केली होती असे देखील त्यांनी सांगितले.
5 / 7
जितेंद्र यांनी सांगितले की, त्यांच्या चाळीत गणेशोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जात असे. ते आजही गणपतीत त्यांच्या चाळीत आवर्जून जातात.
6 / 7
जितेंद्र यांच्या चाळीविषयी त्यांनी सांगितले की, आमच्या चाळीत कोणाकडे एखादे सामान नसेल तर आम्ही लगेचच दुसऱ्याकडे जाऊन ते मागत असू आणि त्यांना नंतर परत करायचो.
7 / 7
मी 20 वर्षं चाळीत राहिलो... ते माझ्या आयुष्यातील सगळ्यात बेस्ट दिवस होते असे जितेंद्र यांनी सांगितले.
टॅग्स :जितेंद्र