Join us

Bhagya Dile Tu Malal :'नऊवारी साडी, नाकात नथ' पाहा राजच्या कावेरीचा पारंपारिक थाट, पाहा लग्नातील Inside Photo

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 4:38 PM

1 / 9
लग्न म्हणजे नव्या आयुष्याची सुरुवात... जन्मभराचे ऋणानुबंध. प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा क्षण. आणि हाच क्षण आता आपल्या राज आणि कावेरीच्या आयुष्यात आला आहे.
2 / 9
ज्या क्षणाची वाट राज कावेरीसोबत अख्खा महाराष्ट्र बघत होता तो क्षण आता जवळ आला आहे. मोठ्या धुमधडाक्यात राज आणि कावेरीचं लग्न होणार आहे.
3 / 9
एकीकडे स्वत:ची संस्कृती जपण्याचा ध्यास असणारी आणि परंपरेचा डोळस अभिमान बाळगणारी कावेरी तर दुसरीकडे नाविन्याची कास असणारा राजवर्धन एकेमकांना समोर आले आंणि दोघांमध्ये हळुवार प्रेम फुलत गेले.
4 / 9
कावेरी आणि राजवर्धनच्या या गोष्टीमध्ये अनेक अनपेक्षित वळण आली, कधी गैरसमज तर कधी प्रेम तर कधी भांडणाची वादळ, कधी दुरावा… एकमेकांच्या साथीने सगळ्यांशी लढत आता तो शुभ दिवस आला आहे.
5 / 9
राज - कावेरी यांचा विवासोहळा आनंदात पार पडणार आहे लग्नासाठी कावेरीचा खास मराठमोळा लूक असणार आहे.
6 / 9
नऊवारी, नथ, शेला, हिरवा चुडा या लुकमध्ये कावेरी खूप सुंदर दिसत आहे.
7 / 9
दोघांचाही अस्सल मराठमोळा बाज दिसून येणार आहे. लग्न पारंपरिक पध्दतीने पार पडणार आहे.
8 / 9
सप्तपदी, मंगलाष्टक, सुनमुख सगळ्या विधी पर पडणार आहेत. खऱ्या अर्थाने राजला कावेरीची साता जन्मासाठी साथ मिळाली आहे.
9 / 9
'रत्नमालासाठी तिच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस आहे कारण याच दिवसाची वाट ती कुठेतरी बघत होती. कारण कावेरीच्या आयुष्यात येण्याने राजमध्ये खूप बदल झाले आहेत.
टॅग्स :कलर्स मराठी