Join us  

भाग्यश्री लिमयेने दुबईत चालवली बोट, मरिना बीचवर अभिनेत्रीचा दिसला बोल्ड लूक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2024 2:21 PM

1 / 7
'घाडगे अँड सून','बॉस माझी लाडाची' मधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री भाग्यश्री लिमये (Bhagyashree Limaye) नुकतीच 'मुंज्या' सिनेमात दिसली. यातील तिच्या रुक्कू या भूमिकेनेही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं.
2 / 7
भाग्यश्रीने याआधी 'सत्यमेव जयते 2' या हिंदी सिनेमातही काम केलं आहे. मालिका ते मोठा पडदा असा तिचा प्रवास आहे. भाडिपाच्या 'कांदे पोहे' कार्यक्रमामुळे तर तिचे अनेक चाहते झालेत.
3 / 7
भाग्यश्रीने नुकतेच दुबईचे काही फोटो पोस्ट केलेत. यात तिचा स्टायलिश आणि बोल्ड अवतार पाहायला मिळतोय. दुबईच्या बुर्ज खलिफा, मरिना बीचवरचे हे काही फोटो आहेत.
4 / 7
दुबईत भाग्यश्रीने चक्क बोट चालवली. बोट चालवतानाचे फोटो तिने शेअर केलेत. मरिना बीचवर तिने बोटींगचा आनंद घेतला आणि स्वत:ही चालवली. 'तुमचा विश्वास बसतोय का की मी खरंच बोट चालवली?'
5 / 7
निळ्या रंगााचा स्लीव्हलेस क्रॉप टॉप आणि ब्लॅक शॉर्ट स्कर्ट यात ती भलतीच हॉट दिसत आहे. तिने काही बोल्ड पोज देत बोटीवर फोटोशूट केलंय. तसंच मागे दुबईचा सुंदर नजाराही दिसत आहे.
6 / 7
भाग्यश्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनीही कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 'अब तो दुबई खतरे मे है','किती क्युट दिसते' अशा कमेंट्स तिच्या फोटोंवर आल्या आहेत.
7 / 7
भाग्यश्रीची काही महिन्यांपूर्वी 'अरेंज्ड मॅरेज पॅच अप' ही सीरिजही आली होती. यातही तिचं काम प्रेक्षकांना आवडलं होतं. आता तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी चाहते उत्सुक आहेत.
टॅग्स :भाग्यश्री लिमेयमराठी अभिनेतासेलिब्रिटीदुबईव्हायरल फोटोज्