Bhaubeej special: सेलिब्रिटींची भाऊबीज! मराठी सेलिब्रिटींचे रिअल लाईफ भाऊ-बहिण माहित आहेत का? By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2021 8:00 AM1 / 10मराठी, गुजराती, हिंदी अशा अनेक सिनेमांत नाव कमावणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला दोन भाऊ आहेत. संदीप आणि संदेश. दरवर्षी सोनाली संदेश आणि संदीप यांच्यासोबत भाऊबीज आनंदात साजरी करते.2 / 10मराठी सिनेइंडस्ट्रीची अप्सरा सोनाली कुलकर्णी हिचा भाऊ अतुल कुलकर्णी हा सुद्धा चित्रपटक्षेत्रात कार्यरत आहे. त्याच्यासोबतचे अनेक फोटो सोनाली शेअर करत असते.3 / 10टीव्हीवरची लोकप्रिय अभिनेत्री रूपाली भोसले हिलाही लहान भाऊ आहे. रूपाली बिग बॉस मराठीमध्ये गेली होती, तेव्हा तिचा भाऊ तिला भेटायला आलेला तुम्ही पाहिला असेलच.4 / 10अभिनेता शशांक केतकरच्या बहिणीला तुम्ही ओळखत असालच.‘तू सौभाग्यवती हो’ या मालिकेत दिसलेली दीक्षा केतकर शशांकची सख्खी बहीण आहे. 5 / 10दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डेची बहिण म्हणजे स्वानंदी बेर्डे. स्वानंदी ही अभिनयची एकुलती एक बहिण. दोघांचाही मस्त बॉन्ड आहे. अनेकदा दोघंही सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात. 6 / 10अभिनेता सिद्धार्थ जाधवला एक बहीण आणि एक भाऊ आहे. तिघा भावंडांमध्ये सिद्धार्थ सर्वात लहान आणि सर्वांचा लाडका.7 / 10अमेय वाघ याला एक लहान बहीण आहे. तिच्यासोबतचे फोटो तो शेअर करत असतो.8 / 10अभिनेत्री पूजा सावंतला श्रेय नावाचा लहान भाऊ आहे. श्रेयसोबतचे अनेक फोटो पूजा शेअर करत असते.9 / 10अभिनेत्री संस्कृती बालगुडेला समर्थ नावाचा लहान भाऊ आहे. दोघांमध्ये खूप चांगला बॉन्ड आहे. 10 / 10गश्मीर महाजनीला त्याच्यापेक्षा 13 वर्षांनी मोठी बहीण आहे. ती म्हणजे माझी छोटी आई,असं गश्मीर म्हणतो. आणखी वाचा Subscribe to Notifications