सना, झायरानंतर आणखी एका अभिनेत्रीचा फिल्मइंडस्ट्रीला रामराम, निकाहानंतर सोडलं करिअर By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 3:12 PM1 / 7इस्लामसाठी सना खान, झायरा वसीम सारख्या अभिनेत्रींनी मनोरंजनसृष्टीला कायमचा रामराम केला. त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. आता आणखी एका अभिनेत्रीने निकाह झाल्यानंतर फिल्म इंडस्ट्री सोडली आहे.2 / 7भोजपुरी अभिनेत्री सबा खानने (Saba Khan) काही दिवसांपूर्वीच मनोरंजनसृष्टीत काम करणं बंद केलं होतं. आता तिने निकाह केला असून तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.3 / 7सबाने निकाहपूर्वीचा एक फोटो शेअर केला. यात तिने सिल्व्हर रंगाचा ब्राईडल लेहेंगा आणि ज्वेलरी परिधान केली होती. लग्नाच्या जोड्यात ती सुंदर दिसर होती. तसंच तिच्या चेहऱ्यावर आनंदही स्पष्ट दिसत होता.4 / 7आणखी एका फोटोत सबाने लाल आणि क्रीम रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. यातही ती राजकुमारीसारखीच रॉयल दिसत आहे. यावर तिने परिधान केलेले दागिनेही आकर्षक आहेत.5 / 7सबा खान नुकतीच कुठे तिच्या करिअरमध्ये यश मिळवत होती. मात्र अचानक तिने ग्लॅमर दुनियेतून कायमचा निरोप घेतला. इतकंच नाही तर तिने सोशल मीडियावरुन पोस्टही डिलीट केले. 6 / 7सबा काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीत म्हणाली होती की तिला इंडस्ट्रीत मोठं नाव कमवायचं आहे. इथे पोहोचण्यासाठी ती घरच्यांच्याही विरोधात गेली. पण आता तिने निकाह करण्याचा निर्णय घेतला.7 / 7सबाच्या या निर्णयानंतर चाहत्यांनी तिला अनेक प्रश्न विचारले आहेत. तिच्यावर काही दबाव आहे का म्हणून तिने असा निर्णय घेतला अशीही शंका चाहत्यांनी व्यक्त केली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications