२६ जानेवारीच्या परेडसाठी मेहनत घेतेय रवी किशनची मुलगी; ७ गर्ल्स बटालियनची कॅडेट, म्हणाले- ही अभिमानाची...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 20:03 IST
1 / 7भोजपुरी आणि हिंदी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता रवी किशन (Ravi Kishan) अभिनय आणि राजकारणातील प्रसिद्ध चेहरा बनले आहेत. त्यांच्याबाबत रोज नवनव्या बातम्या समोर येत असतात. आज आम्ही तुम्हाला रवी किशन यांची मुलगी इशिता शुक्ला हिच्याबद्दल सांगणार आहोत. इशिता शुक्ला हिने ‘अग्निपथ’ योजनेत सामील व्हायचे आहे आणि यासाठी ती तीन वर्षांपासून मेहनत घेत आहे. पण त्याआधी ती या वर्षी 2023 च्या प्रजासत्ताक दिनानिमित्त स्वतःला आणि भारताच्या NCC कॅडेट म्हणून प्रजेंट करण्यासाठी येत आहे. त्यासाठी तिने विशेष तयारीही केली आहे. (फोटो इन्स्टाग्राम)2 / 7भोजपुरी सुपरस्टार रवी किशन यांच्या मुलीला अग्निवीरचा भाग व्हायचे आहे आणि ती एनसीसी कॅडेट आहे, गेली 3 वर्षे सक्रिय आहे. येथे ती 7 गर्ल्स बटालियनची कॅडेट आहे. हे आम्ही म्हणत नसून खुद्द रवी किशन यांनी सोशल मीडियावर शेअर केली असून ते स्वत: परफॉर्म करणार असल्याची माहिती दिलीय. (फोटो इन्स्टाग्राम) 3 / 7रवी किशन यांनी इंस्टाग्रामवर मुलीचे अनेक फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये इशिता शुक्ला एनसीसी युनिफॉर्ममध्ये दिसत आहे आणि ती खूप मेहनत करताना दिसत आहे. यामध्ये ती कधी राष्ट्रपती भवनाजवळ रायफल घेऊन शूटिंग करताना दिसत आहे.(फोटो इन्स्टाग्राम) 4 / 7पोस्ट शेअर करण्यासोबतच रवी किशन यांनी आपल्या मुलीचा अभिमान व्यक्त करत लिहिले की, 'माझी धाडसी मुलगी इशिता शुक्ला गेल्या ३ वर्षांपासून कठोर परिश्रम करत आहे. ती दिल्ली संचालनालयाच्या 7 गर्ल्स बटालियनची कॅडेट आहे. प्रजासत्ताक दिनासाठी ती थंडी आणि धुक्याशी लढत आहे. वडील म्हणून माझ्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसमोर राष्ट्रीय परेडमध्ये ती सहभागी होणार आहे.(फोटो इन्स्टाग्राम) 5 / 7इतर भोजपुरी स्टार्सनीही रवी किशन यांच्या पोस्टवर कमेंट केल्या आहेत आणि इशिता शुक्लाला शुभेच्छा देण्यासोबतच त्यांना अभिमान वाटत आहे. रवी किशन यांची ही पोस्ट व्हायरल होत आहे.(फोटो इन्स्टाग्राम) 6 / 7रवी किशन यांची मुलगी इशिता शुक्लाला अग्निवीरचा भाग बनायचे आहे. तिने ही इच्छा तिच्या वडिलांकडे बोलून दाखवली होती आणि अभिनेत्यानेही त्याला होकार दिला होता, त्यानंतर तिने जोरदार तयारी सुरू केली होती. (फोटो इन्स्टाग्राम) 7 / 7इशिता शुक्ला खूप प्रतिभावान आहे. ती सोशल मीडियावर देखील खूप सक्रिय आहे. (फोटो इन्स्टाग्राम)