Join us

IN PICS : ‘भुल भुलैय्या 2’ सुपरहिट होताच वाढले कार्तिकचे भाव, आता एका सिनेमासाठी घेणार इतके कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 1:29 PM

1 / 8
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन सध्या जाम खूश्श आहे. कारणही तसंच आहे. कार्तिकच्या ‘भुल भुलैय्या 2’ या चित्रपटाने 100 कोटींचा टप्पा कधीच ओलांडला आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने आत्तापर्यंत 122.69 कोटींचा गल्ला जमवला आहे. साहजिकच कार्तिकचे भावही वाढले आहेत.
2 / 8
होय, ‘भुल भुलैय्या 2’ची बॉक्स ऑफिसवरची कामगिरी पाहून सगळीकडे कार्तिकचं कौतुक होतंय. या सुपरडुपर हिट सिनेमानंतर कार्तिकची डिमांड वाढणारच. होय, मिडिया रिपोर्टनुसार ‘भुल भुलैय्या 2’नंतर कार्तिकने त्याची फी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
3 / 8
याआधीच्या पाच रिलीजपैकी कार्तिक आर्यनचा ‘भुल भुलैय्या 2’ हा चौथा क्लिन हिट आहे. एकापाठोपाठ एक हिट सिनेमे दिल्यानंतर आता कार्तिकने मानधनात वाढ केली आहे.
4 / 8
आत्तापर्यंत कार्तिक एका चित्रपटासाठी 15 ते 20 कोटी चार्ज करायचा. पण ‘भुल भुलैय्या 2’च्या अपार यशानंतर आता त्याने फी वाढवली आहे. बॉलिवूड लाईफने दिलेल्या वृत्तानुसार, आता तो एका चित्रपटासाठी 35 ते 40 कोटी फी घेणार आहे.
5 / 8
बॉलिवूडमध्ये कोणीही गॉडफादर नसताना कार्तिकने स्वबळावर स्वत:चं स्थान निर्माण केलं. अपार कष्ट घेतले, संघर्ष केला. त्याच्या कष्टाचं फळ त्याला मिळत आहेत.
6 / 8
स्ट्रगल काळात कार्तिकने अनेक नकार पचवले. सलग तीन वर्ष आॅडिशन आणि रिजेक्शनला त्याला सामोरे जावे लागले होते. कधी अनफिट म्हणून, कधी चेहरा पाहून कार्तिकला रिजेक्ट करण्यात आलं होतं.
7 / 8
कार्तिक आर्यन करण जोहरच्या ‘दोस्ताना 2’मधून आऊट झाल्यानंतर चर्चेत आला होता. त्यावेळी कार्तिकवर अनप्रोफेशनल वागणुकीचा आरोपही झाला होता. पण या सगळ्या अफवा असल्याचं कार्तिकने म्हटलं होतं. कधीकधी लोक राईचा पर्वत करतात, असं तो म्हणाला होता.
8 / 8
कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झाल्यास, लवकरच तो ‘शहजादा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कार्तिकसोबत क्रिती सॅनन लीड रोलमध्ये आहे. हा चित्रपट तेलगू सिनेमा अला वैकुंठपुरमुलुचा रिमेक आहे.
टॅग्स :कार्तिक आर्यनभूल भुलैय्या