Join us

Photos : प्रेम करूया खुल्लम खुल्ला...! अन् मीडियासमोरच सुरु झाला एजाज खान व पवित्रा पुनियाचा रोमान्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2021 3:49 PM

1 / 8
बिग बॉस 14 चे स्पर्धक पवित्रा पुनिया आणि एजाज खान एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों... म्हणत, हे कपल फिरत आहे.
2 / 8
काल एजाज व पवित्रा एका बर्थ पार्टीला आले. पार्टीत दोघांनीही अगदी डॅशिंग एन्ट्री घेतले आणि मग मीडियासमोरच एकमेकांवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसले.
3 / 8
यावेळी एजाजने कोणाचीही पर्वा न करता पवित्राच्या गालावर किस केले.. कधी तिच्या डोळ्यात बघत तर कधी तिला मिठी मारत त्याने प्रेम व्यक्त केले.
4 / 8
यावेळी दोघांच्या मॅचिंग कपड्यांनीही लक्ष वेधून घेतले. एजाजने यावेळी ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट फ्लोरल शर्ट घातला होता तर पवित्राने व्हाईट कलरचे सिल्व्हर शिमरी जॅकेट व सोबत ब्लॅक ट्राऊजर कॅरी केला होता.
5 / 8
एजाज व पवित्रा बिग बॉसच्या घरातच एकमेकांच्या प्रेमात पडले होते. दोघांनीही एकाचवेळी बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली होते.
6 / 8
बिग बॉसच्या घरात दोघांत अनेकदा वाद झालेत आणि तसेच प्रेमही बहरले. काही आठवड्यानंतर पवित्रा घरातून आऊट झाली. त्यानंतर एजाजला पवित्रावरच्या प्रेमाची जाणीव झाली होती.
7 / 8
एजाज खान हा ‘काव्यांजली’ या टीव्ही शोमुळे नावारूपास आला होता. पुढे ‘तनु वेड्स मनु’ या सिनेमातही तो झळकला.
8 / 8
कुछ ना कहो, मीराबाई नॉट आऊट, जिला गाजियाबाद, लकी कबुतर, शोरगुल, अपस्टार्ट या सिनेमातही त्याने भूमिका साकारल्या.
टॅग्स :बिग बॉस १४