पतीपासून लांब राहते राखी सावंत, म्हणून पडलीय एकटी, राहुल महाजनने सांगितल्या तिच्या विषयी धक्कादायक गोष्टी By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 2:28 PM1 / 10राखी सावंतने पहिल्याच दिवसापासून सर्वांचे मनोरंजन केले आहे. भांडण, भावनात्मक नाटक कितीही असो, प्रत्येक वेळी राखी गंमतीदार गोष्टी करत सा-यांचे मनोरंजन करत आहे.2 / 10रसिकांचे मनोरंजन करण्यासाठी राखी कोणतीच कसर बाकी ठेवत नाहीय. ना-ना त-हा करत ती सतत लक्ष वेधून घेते. 3 / 10घरात राहुल महाजन जो स्वतःला राखीचा चांगला मित्र असल्याचे सांगतो. तोच राहुल महाजन वेळ पडल्यावर राखील सपोर्टही करत नाही.4 / 10 राहुल महाजनने राखीचे अनेक किस्से सांगितले, 'राखी इतकी स्ट्रॉंग बनली आहे याला कारण म्हणजे तिच्या आयुष्यात ती खूपच एकटी पडली आहे.5 / 10गेली दोन वर्षे तिच्या पतीलाही भेटलेली नाही. राहुलने सांगितले की यापूर्वी कधीही तिला इतके एकटे पडल्याचे पाहिले नव्हते.6 / 10लग्नानंतर ती पतीबरोबर हनीमूनला जावू शकली नाही आणि दोन वर्षांपासून भेटली नाहीय. ती खूप मानसिकरित्या खचली गेली आहे. 7 / 10खीची अशी इच्छा आहे की तिच्याबरोबर असलेली प्रत्येकजण तिच्याकडे परत यावी. कोणीही तिच्यापासून लांब जावू नये. 8 / 10आज राखी खूप यशस्वी अभिनेत्री आहे. करोडो रुपयांची तिच्याकडे संपत्ती आहे, पण राखीकडे तिच्यावर प्रेम करणारी माणसं नाहीत.9 / 10 राहुलने राखी विषयीच्या सगळ्या गोष्टी घरात सांगत तिच्यावर चर्चा करताना दिसला. 10 / 10राखीच्या येण्याने यंदाचा सिझन तुफान हिट ठरत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications