Join us

Bigg Boss 15 : कन्येकडून गडबड होणार..., करण व तेजस्वीच्या नात्यावर पंडितजींची भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 4:19 PM

1 / 7
‘बिग बॉस’च्या घरात अनेकजण प्रेमात पडतात. ‘बिग बॉस 15’मध्ये करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश यांची लव्हस्टोरी सुरू झाली आणि बघता बघता करण व तेजस्वीची जोडी हिट झाली.
2 / 7
‘बिग बॉस’च्या घरात बहरलेल्या करण व तेजस्वीच्या लव्हस्टोरीचं भविष्य काय असणार? बिग बॉसमधून बाहेर पडल्यानंतर करण व तेजस्वीचं नातं किती पुढे जाणार? साहजिकच हे प्रश्न चाहत्यांना पडले आहे.
3 / 7
आता त्याचंही उत्तर मिळालं आहे. होय, पंडित जनार्दन यांनी करण व तेजस्वीच्या नात्याबद्दल एक शॉकिंग भविष्यवाणी केली आहे. आजच्या एपिसोडमध्ये पंडित जनार्दन घरातील स्पर्धकांबद्दल भविष्यवाणी करणार आहेत. याचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे.
4 / 7
प्रोमोमध्ये पंडित जनार्दन करणबद्दल भविष्यवाणी करत आहेत. ‘तुझी दोन नाती संपुष्टात आलीत. आता तिसरं गुप्त नातं सुरू आहे. पण लग्न होणं अशक्य आहे. कन्येकडून गडबड होईल,’ असं जनार्दन या प्रोमोमध्ये सांगत आहेत.
5 / 7
तेजस्वी व करण हे बिग बॉस 15 मधील स्ट्रॉग कंटेस्टंट आहेत. करण कुंद्रा याआधी अनुषा दांडेकरसोबत रिलेशनशिपमध्ये होता. काही महिन्यांपूर्वीच दोघांचं ब्रेकअप झालं.
6 / 7
अनुषाच्या प्रेमात पडण्याआधी करण कुंद्रा अनेक वर्षे कृतिका कामराच्या प्रेमात होता. ‘कितनी मोहब्बत है’ या मालिकेच्या सेटवर त्या दोघांची ओळख झाली होती.
7 / 7
चर्चा खरी मानाल तर तेजस्वी प्रकाशचा बिग बॉसच्या घराबाहेर एक बॉयफ्रेन्ड आहे. त्याचं नाव विनीत खेडकर आहे. त्याला क्रिश खेडकर म्हणूनही ओळखतात.
टॅग्स :करण कुंद्राबिग बॉसतेजस्वी प्रकाश