Join us

जुनी कार विकून घेतली नवी Audi! अंकिता वालावलकर म्हणते- "अंथरुण पाहून पाय पसरावे म्हणतात, पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2025 13:41 IST

1 / 9
'बिग बॉस मराठी' फेम अंकिता वालावलकरने काही दिवसांपूर्वीच तिची पहिली कार विकली. पण, त्यानंतर नववर्षाच्या सुरुवातीलाच तिने नवी कोरी ऑडी खरेदी केली आहे.
2 / 9
अंकिताने तिच्या ऑडीला आवडी हे नाव दिलं आहे. लक्झरी कार घेतल्यानंतर अंकिताने सोशल मीडियावर भली मोठी पोस्ट शेअर केली आहे.
3 / 9
यामध्ये तिने दिखाव्यासाठी गाडी घेतलेली नाही असं म्हटलं आहे. त्याबरोबरच मोठी स्वप्न बघण्याचा सल्लाही तिने चाहत्यांना दिला आहे.
4 / 9
अंकिता म्हणते, 'फार मोठी स्वप्नं बघू नये. अंथरूण पाहून पाय पसरावेत हे ऐकत मोठे झालो.पण मोठी स्वप्नं बघायला हरकत काय आहे आणि अंथरूण लहान आहे तर अंथरूण मोठं घेऊ असा विचार करत इथपर्यंत पोचलेय'.
5 / 9
'जेव्हा जेव्हा मी एक पाऊल मागे गेलेय ते नेहमीच झेप घेण्यासाठी. गावातून मुंबईत येणं...त्यानंतर २ बहीणीना मुंबईत आणणं,भाड्याचं घर शोधणं,मुंबईत राहणं,स्वतःचं अस्तित्त्व निर्माण करणं हा प्रवास सोप्पा नव्हता'.
6 / 9
'आईबाबांनी जो विश्वास दाखवला त्यामुळेच एवढं करू शकले.आज ही घेतलेली गाडी दिखाव्यासाठी नाही तर अंथरूण व्यवस्थित असल्यामुळे घेतलीय'.
7 / 9
'मी तर म्हणेन मोठी स्वप्नं बघा. कोणतंही काम करायला लाजू नका. कधीतरी नमतं घ्या. कधीतरी स्वतःहून बोला, पण हे होत नाही आता कसं होईल म्हणून थांबू नका'.
8 / 9
'माकाच बघा यंदा आवडीतसुन हापूस आंबे विकतलंय', असं तिने म्हटलं आहे.
9 / 9
अंकिताच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे. त्याबरोबरच नवीन गाडीसाठी अभिनंदनही केलं आहे.
टॅग्स :अंकिता प्रभू वालावलकरटिव्ही कलाकारबिग बॉस मराठीआॅडी