Chirag Paswan: कंगनाच्या ऑनस्क्रीन हिरोची राजकारणात एन्ट्री; २ वेळा संसद गाजवणारा खासदार ठरतोय 'नॅशनल क्रश' By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2024 1:02 PM1 / 9यंदाची लोकसभा निवडणूक अनेक कारणांनी चर्चेची ठरली. या निवडणुकीचे निकाल आश्चर्यचकित करणारे होते. लोकसभा निवडणुकीत २४० जागा मिळाल्याने स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचं भाजपाचं स्वप्न भंगलं. पण, तरीही NDA ला बहुमत मिळाल्याने भाजपा पुन्हा सत्ता स्थापन करण्यात यशस्वी ठरत आहे. 2 / 9लोकसभा निवडणुकीत अनेक सेलिब्रिटींनाही पसंती मिळाली. यंदा संसदेत अनेक नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. त्यापैकीच एका चेहऱ्याची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. 3 / 9लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष आणि खासदार असलेले चिराग पासवान २०२४च्या लोकसभा निवडणुकीमुळे चर्चेत आले आहेत. त्यांच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सध्या सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल होत असून ते नॅशनल क्रश बनले आहेत. 4 / 9चिराग पासवान यांची लोकजनशक्ती पार्टी NDAमध्ये असून ते भाजपाबरोबर सत्तेतही असणार आहेत. बिहारमधील हिजापूर मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. ६ लाख १५ हजार ७१८ मतं मिळवत त्यांनी विजय मिळवला. 5 / 9बिहारमध्ये चिराग पासवान यांच्या पक्षाला पाच जागांवर विजय मिळवता आला आहे. यंदाच्या मोदी सरकारमध्ये चिराग पासवान यांना मंत्रीपद दिलं जाण्याची शक्यता आहे.6 / 9राजकारणात सक्रिय होण्याआधी चिराग पासवान यांना अभिनयात करिअर करायचं होतं. २०११ मध्ये त्यांनी 'मिले ना मिले हम' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमात बॉलिवूडची क्वीन कंगना रणौतबरोबर त्यांनी स्क्रीन शेअर केली होती. 7 / 9अभिनयासाठी त्यांनी इंजिनियरिंगचं शिक्षण अर्धवटच सोडलं. पण, या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर फार चांगलं यश मिळवता आलं नाही. पहिलाच सिनेमा फ्लॉप गेल्याने चिराग पासवान यांनी बॉलिवूडमधून काढता पाय घेतला.8 / 9त्यानंतर त्यांनी वडील राम विलास पासवान यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात नशीब आजमवायचं ठरवलं. २०१४ मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवाराचा पराभव करत विजय मिळवला. 9 / 9२०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी लोक जनशक्ती पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. या निवडणुकीतही त्यांना विजय मिळाला. आता ते सलग तिसऱ्यांदा खासदार झाले आहेत. आणखी वाचा Subscribe to Notifications