IN PICS : 5 वर्षांपासून एकही सिनेमा नाही, तरीही पती करणपेक्षा 7 पट श्रीमंत आहे बिपाशा बासू By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2021 2:58 PM1 / 10बिपाशा बासूचा आज वाढदिवस. बिप्स आज 41 वर्षाची झाली. 5 वर्षांपूर्वी बिपाशा ‘अलोन’ या सिनेमात दिसली होती. 2015 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमानंतर बिपाशा एकाही सिनेमात दिसली नाही. पण संपत्ती म्हणाल तर पती करण सिंग गोव्हरपेक्षा तिच्याकडे सातपट संपत्ती आहे.2 / 10इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार, बिपाशाकडे पतीपेक्षा 7 पट अधिक प्रॉपर्टी आहे. 2020 मध्ये तिची नेटवर्थ प्रॉपर्टी सुमारे 109 कोटी रूपये आहे. 3 / 10बिपाशाच्या पतीचे अर्थात करणची प्रॉपर्टी किती तर त्याच्याकडे 14.16 कोटींची एकूण संपत्ती आहे.4 / 10बिपाशाकडे सिनेमे नाहीत, पाच वर्षांपासून एकही सिनेमा रिलीज झालेला नाही. मात्र तिच्याकडे अनेक मल्टी नॅशनल कंपन्यांच्या जाहिराती आहेत. यातून ती बराच पैसा कमावते.5 / 10बिपाशा फिटनेसची दिवानी आहे. त्यामुळे रिबॉक, एरिस्ट्रोकेट लगेज, कॅडिला शूगर फ्रि अशा अनेक मोठ्या बॅ्रंडच्या जाहिराती तिने केल्या आहेत.6 / 10बिपाशा अनेक स्टेज शो करते. एका शोसाठी ती सुमारे 2 कोटी रूपये चार्ज करते.7 / 10बिपाशाला ब्लॅक ब्युटी म्हणतात. 40 पेक्षा अधिक मॅगझिनच्या कव्हरपेजवर ती झळकली आहे.8 / 10बिपाशाकडे मुंबईत दोन घर आहेत. कोलकात्यातही तिचे एक घर आहे. याची किंमत कोट्यावधी रूपयांच्या घरात आहे.9 / 10लक्झरी गाड्यांबद्दल म्हणायचे तर ऑडी 7, पोर्शे, फॉक्सवॅगन बीटल अशा अलिशान गाड्या तिच्याकडे आहेत.10 / 10आज बिपाशाकडे सिनेमांच्या ऑफर नाहीत. पण एकेकाळी ती बॉलिवूडच्या टॉपमोस्ट अभिनेत्रींपैकी एक होती. एका सिनेमासाठी ती त्यावेळी 2 ते 3 कोटी रूपये घ्यायची. अनेक बंगाली सिनेमातही तिने काम केले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications