14 व्या वर्षी अनाथ झाला, दारोदारी लिपस्टिक विकत हिंडला! अर्शद वारसीची इमोशनल सक्सेस स्टोरी By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 4:07 PM1 / 10संजय दत्तच्या ‘मुन्नाभाई’ या चित्रपटात ‘सर्किट’ची भूमिका साकारून नावारूपास आलेला अभिनेता अर्शद वारसी (Arshad Warsi) याचा आज (19 एप्रिल) वाढदिवस. ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटातून डेब्यू करणा-या अर्शदने आजपर्यंत अनेक चित्रपटांत दमदार अभिनय केला. ‘इश्किया’ आणि ‘जॉली एलएलबी’ हे त्याचे चित्रपट खास गाजले. आज अर्शद बॉलिवूडचा प्रतिभावान, हरहुन्नरी अभिनेता म्हणून ओळखला जातो. पण इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. 2 / 1019 एप्रिल 1968 रोजी मुंबईत अर्शदचा जन्म झाला. अर्शद उण्यापु-या 14 वर्षांचा असताना त्याचा वडिलांचा बोन कॅन्सरने मृत्यू झाला. वडिलाच्या मृत्यूनंतर दोनच वर्षात आईनेही साथ सोडली. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात अर्शदचे शालेय शिक्षण झाले. मात्र आई-बाबाविना पोरक्या झालेल्या अर्शदला गरिबीमुळे दहावीनंतरचे शिक्षण सोडावे लागले.3 / 10पोटासाठी पैशांची गरज होती. या काळात अर्शदने घरोघरी जात लिपस्टिक व सौंदर्य प्रसाधने विकण्याचे काम स्वीकारले. या पैशात भागत नाही म्हटल्यावर फोटो लॅबमध्येही काम केले. 4 / 10हे सगळे करत असताना त्याच्या मनात डान्स शिकण्याची इच्छा जोर धरू लागली. मग काय, अर्शदने काम करता करता एक डान्स ग्रूप ज्वॉईन केला. हा निर्णय अर्शदच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.5 / 101991 मध्ये अर्शदने इंडियन डान्स कॉम्पिटिशन जिंकले. यानंतर पुढच्याच वर्षी वर्ल्ड डान्स चॅम्पियनशिपमध्ये चौथा क्रमांक पटकावला. या बळावर अर्शदने आॅसम नावाने स्वत:ची डान्स अॅकेडमी सुरु केली. याच डान्स अॅकेडमीत डान्स शिकायला 6 / 10डान्स अॅकेडमीत शिकायला येणाºया एका विद्याथीर्नीवर अर्शदचे प्रेम जडले. तिचे नाव होते, मारिया गोरेटी. 1999 मध्ये अर्शद व मारियाचे लग्न झाले. मारियाची आयुष्यातील एन्ट्री अर्शदसाठी आणखी भाग्याची ठरली. त्याला बॉलिवूडमध्ये एन्ट्री मिळाली.7 / 101993 मध्ये ‘रूप की रानी चोरों का राजा’चे टायटल ट्रॅक कोरिओग्राफ करण्याची संधी त्याला मिळाली. हा चित्रपट आपटला पण ‘रोमिया नाम मेरा’ हे अर्शदने कोरिओग्राफ केलेले गाणे मात्र तुफान लोकप्रीय झाले होते. हे अर्शदचे मोठे यश होते.8 / 10पुढे अर्शदला अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून संधी मिळाली. महेश भट यांच्या ‘ठिकाणा’ व ‘काश’ या चित्रपटात त्याने अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले.9 / 10अमिताभ बच्चन यांची प्रॉडक्शन कंपनी एबीसीएलद्वारे अर्शदने अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले. बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, खुद्द जया बच्चन यांनी अर्शदला ‘तेरे मेरे सपने’ची आॅफर दिली होती. 10 / 101996 साली प्रदर्शित झालेल्या ‘तेरे मेरे सपने’या चित्रपटामध्ये सह-नायकाची भूमिका करून अर्शद हिट झाला. यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. राजकुमार हिरानीच्या ‘मुन्ना भाई एम.बी.बी.एस.’ आणि ‘लगे रहो मुन्ना भाई’ या विनोदी चित्रपटांमधील सर्किटच्या भूमिकेमुळे अर्शद वारसी ख-या अर्थाने प्रकाशझोतात आला. आणखी वाचा Subscribe to Notifications