पाहुण्यांना शूटींग पाहायला घेऊन गेली अन् ‘उत्तरा’ बनली...! आजही तितकीच सुंदर दिसते वर्षा उसगावकर By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2021 8:00 AM1 / 12मराठी इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेत्री वर्षा उसगावकर आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. सौंदर्य आणि अभिनयकलेच्या जोरावर वर्षा यांनी मराठी तसेच हिंदी क्षेत्रातही नाव कमावले. वर्षा उसगावकर यांनी मराठी चित्रपटात नेहमीच सोज्वळ आणि बबली गर्लच्या भूमिका साकारल्या. पण एका भूमिकेसाठी त्या कायम स्मरणात राहतील. ती म्हणजे, महाभारतातील उत्तराची भूमिका.2 / 12ही भूमिका वर्षा यांना अगदी योगायोगाने मिळाली होती. होय, त्या दिवसात महाभारत मालिका खूप लोकप्रिय होती. अशात एक दिवस वर्षा यांच्याकडे काही पाहुणे आलेत. त्यांनी शूटींग पाहण्याची इच्छा व्यक्त केली आणि वर्षा या पाहुण्यांना महाभारताच्या सेटवर घेऊन गेल्या.3 / 12सेटवर अभिमन्यूचे दृश्य शूट होते आणि निर्माता-दिग्दर्शक त्याची पत्नी उत्तराच्या भूमिकेसाठी अभिनेत्री शोधत होते. महाभारतात शकुनीची भूमिका साकारणारे गुफी पेंटल यांच्याकडे प्रॉडक्शन डिझाइनरची जबाबदारीही होती. त्यांनी वर्षा यांना सेटवर पाहिले आणि त्यांना उत्तराच्या भूमिकेसाठी विचारले. मराठी सिनेमातील वर्षा यांचे काम गुफी यांनी पाहिले होते.4 / 12ही भूमिका नाकारण्याचे वर्षा यांच्याकडे कारण नव्हते. त्यांनी ही भूमिका लगेच स्वीकारली. वर्षा यांनी एका मुलाखतीत याबद्दल सांगितले होते.5 / 12उत्तरेची भूमिका कदाचित माझ्या नशीबातच होती. ही भूमिका मिळाल्याचा माझ्यापेक्षा माझ्या आईवडिलांना अधिक आनंद झाला होता, असे वर्षा म्हणाल्या होत्या.6 / 12गोव्यात बालपण गेलेल्या वर्षा यांनी सौंदर्य आणि अभिनय यांची सांगड घालत प्रेक्षकांच्या मनावर राज्य गाजवलं. किंबहुना आजही गाजवत आहे.7 / 12वर्षा उसगावकर यांनी एका मासिकासाठी हे फोटोशूट केले होते. वर्षा यांचे त्याकाळात अनेक कलाकारांशी नावे जोडले जात पण त्या निव्वळ अफवा ठरत.8 / 12वर्षा यांनी प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक रवीशंकर शर्मा यांचे पुत्र अजय शर्मा यांच्यासोबत संसार थाटला आहे. 9 / 12वर्षा उसगावकर यांनी केवळ मराठीच नाही तर हिंदी, भोजपुरी, बंगाली, तेलुगू, राजस्थानी, कोकणी आणि छत्तीसगडी अशा आठ भाषांतील चित्रपटातून भूमिका करण्याचा विक्रम केला आहे.10 / 12मराठीत 'गंमत- जंमत', 'हमाल दे धमाल', 'लपंडाव', 'भुताचा भाऊ' यांसारख्या मराठी चित्रपटात वर्षा उसगांवकर यांनी साकारलेल्या भूमिका रसिकांना भावल्या. इतकंच नाही तर मराठीतील या यशामुळे वर्षा उसगांवकर यांच्यासाठी हिंदी चित्रपटसृष्टीची दारं उघडली. 11 / 12मराठीसह हिंदीतील दिग्गज कलाकारांसह त्या रुपेरी पडद्यावर झळकल्या. 'परवाने', 'तिरंगा', 'हस्ती', 'दूध का कर्ज', 'घर आया मेरा परदेसी' अशा विविध चित्रपटात वर्षा उसगांवकर यांनी भूमिका साकारल्या.12 / 12म्हणायला वर्षा यांनी कधीच वयाची पन्नाशी ओलांडलीय. पण त्यांचे सौंदर्य तसूभरही कमी झाले नाही. फिटनेसबाबतीत वर्षा अतिशय आग्रही आहेत. त्यांचा फिटनेस भल्याभल्यांना लाजवणारा आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications