जाणून घ्या जितेंद्र यांच्याविषयी कधीही न ऐकलेल्या या गोष्टी, पाचवी गोष्ट तर आहे खूपच इंटरेस्टिंग By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2020 4:40 PM1 / 7जितेंद्र यांचा आज वाढदिवस असून त्यांनी ७८ व्या वर्षांत पदार्पण केले आहे. पंजाबमध्ये जन्मलेल्या जितेंद्र यांनी एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांनी अनेक दाक्षिणात्य चित्रपटांच्या रिमेकमध्ये काम केले आहे. त्यांचे खरे नाव रवी कपूर असे असून त्यांनी चित्रपटसृष्टीत येण्यासाठी त्यांचे नाव बदलले. 2 / 7गीत गाया पत्थरोने या चित्रपटात जितेंद्र यांना नायक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्याआधी त्यांनी नवरंग, सेहरा यांसारख्या चित्रपटांमध्ये छोट्या-मोठ्या भूमिका साकारल्या होत्या. 3 / 7जितेंद्र यांनी अभिनेत्री हेमा मालिनी प्रचंड आवडायच्या. त्यांच्या दोघांचे लग्न देखील होणार होते. पण जितेंद्र यांची प्रेयसी शोभा आणि धर्मेंद्र यांनी हे लग्न मोडले. 4 / 7जितेंद्र आणि शोभा कपूर यांचे लग्न 31 ऑक्टोबर 1974 ला झाले. त्या दोघांचा प्रेमविवाह असून त्यांच्या लग्नाला बॉलिवूडमधील अनेकजण उपस्थित होते. 5 / 7जितेंद्र यांच्या अभिनयाप्रमाणेच त्यांच्या डान्सचे देखील नेहमीच कौतुक केले जाते. त्यामुळे जितेंद्र यांनी जम्पिंग जॅक असे म्हटले जाते. 6 / 7जितेंद्र आणि शोभा यांना तुषार आणि एकता अशी दोन मुलं आहेत. एकताने आज छोट्या पडद्यावर तिचे प्रस्थ निर्माण केले असून तुषारने देखील अभिनयक्षेत्रात त्याचे चांगले नाव कमावले आहे. 7 / 7जितेंद्र अनेक वर्षांपासून अभिनयक्षेत्रापासून दूर असले तरी ते आपल्या कुटुंबियांसोबत फिल्मी पार्टींना, पुरस्कार सोहळ्यांना आवर्जून हजेरी लावतात. आणखी वाचा Subscribe to Notifications