IN PICS : 11 व्या वर्षीच रणबीर कपूरच्या प्रेमात पडली होती आलिया भट, अशी सुुरू झाली होती लव्हस्टोरी By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 11:21 AM1 / 10रणबीर कपूरबद्दल बोलताना आलिया भटच्या चेह-यावरचा आनंद लपता लपत नाही. आलिया व रणबीर हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. या नात्यावर कधीच शिक्कामोर्तब झालेय. सध्या आलिया ज्याप्रमाणे रणबीरच्या कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसतेय, त्यावरून तर हे नाते बरेच पुढे गेल्याचे दिसतेय. पण ही प्रेमकहाणी कशी सुरू झाली? आज हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.2 / 10तर या प्रेमकहाणीची सुरुवात झाली होती, आलिया 11 वर्षाची असताना. होय, ऐकून आश्चर्य वाटेल, पण खुद्द आलियानेच एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. शिवाय कॉफी विद करण या शोमध्येही तिने याबद्दल सांगितले होते.3 / 10त्या मुलाखतीत आलिया रणबीरबद्दल भरभरून बोलली होती. मुलाखतीत अनुष्का शर्मा आणि तब्बू या दोघेही उपस्थित होत्या. या तिघींनाही त्यांच्या बॉलिवूड क्रशबद्दल प्रश्न विचारला गेला होता. यावेळ आलियाने रणबीरचे नाव घेतले होते. 4 / 10मी रणबीरला पहिल्यांदा भेटले, तेव्हा मी 11 वर्षांची होते. तेव्हापासूनच मला तो आवडायला लागला होता, असे आलियाने सांगितले होते.5 / 10ब्लॅक सिनेमाच्या सेटवर मी रणबीरला पहिल्यांदा पाहिले होते. रणबीर संजय लीला भन्साळींचा असिस्टंट म्हणून काम करत होता. त्यादिवशी मी रणबीरला पहिल्यांदा भेटले होते. पहिल्या भेटीतच मला तो आवडला होता, असे आलियाने सांगितले होते.6 / 10 यानंतर मी रणबीरला सावरियां चित्रपटात पाहिले आणि मी अक्षरश: त्याच्या प्रेमात पडले,असेही आलिया म्हणाली होती. 7 / 10 मग तू भींतीवर रणबीरचे पोस्टरही लावले होतेस का? असे अनुष्काने विचारल्यावर तर आलिया लाजून लाजून चूर झाली होती. घराच्या भींतीवर फोटो लावला नाही, पण मी त्याचे फोटो खूप वेळ पाहत राहायची, असे लाजत लाजत तिने सांगितले होते.8 / 10रणबीरआधी आलिया सिद्धार्थ मल्होत्रासोबत रिलेशनशिपमध्ये होती, असे म्हणतात. रणबीरचे तर विचारू नका. दीपिका पादुकोण आणि नंतर कतरिना कैफ या दोघींसोबत त्याचे अफेअर होते. पण या दोघी रणबीरच्या आयुष्यातून बाद झाल्या आणि आलियाची एन्ट्री झाली. निमित्त ठरले, ब्रह्मास्त्र हा सिनेमा.9 / 10ब्रह्मात्र या सिनेमाच्या सेटवर आलिया व रणबीर एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. आलिया तर आधीपासूनच रणबीरच्या प्रेमात होती. दीपिका व कतरिनाशी ब्रेकअप झाल्यावर रणबीरही सिंगल होता. अशात दोघांमध्ये प्रेम बहरले. लवकरच हे कपल लग्न करणार असल्याच्या चर्चा आहेत.10 / 10 आधी दोघांनीही हे नाते जगापासून लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. पण आताश: दोघेही बिनधास्त फिरताना दिसतात. रणबीरच्या प्रत्येक सुख दु:खात आलिया हजर असते. आणखी वाचा Subscribe to Notifications