IN PICS : प्रदीपच्या या गुणांवर भाळली मानसी नाईक, अशी आहे लव्हस्टोरी By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 12:33 PM1 / 10मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक लग्नबेडीत अडकली. बॉक्सर प्रदीप खरेराशी तिने लग्नगाठ बांधली. आज मानसीचा वाढदिवस. 2 / 10लग्नानंतर मानसी आपला पहिला वाढदिवस साजरा करते आहे. साहजिकचा हा वाढदिवस तिच्यासाठी खास आहे. तशीच मानसी व प्रदीपची लव्हस्टोरीही खास आहे.3 / 10फेबु्रवारी 2020 मध्ये मानसीने प्रदीपसोबतचे नाते जगजाहिर केले होते. यानंतर नोव्हेंबर 2020 ला या कपलचा साखरपुडा पार पडला होता.4 / 10 गेल्यावर्षी वाढदिवसाच्या दुस-याच दिवशी मानसीने प्रेमात असल्याची कबुली दिली होती. 5 / 10प्रदीपचा प्रेमळ, विश्वासू आणि कमिटेड स्वभावावर मानसी भाळली होती. त्याच्या याच गुणांमुळे मानसीने त्याला आयुष्यभराचा जोडीदार म्हणून निवडले.6 / 10मानसी नाईक मराठी सुपर डांसर व अभिनेत्री आहे. प्रदीप खरेरा हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे. 7 / 10प्रदीप खरेरा हा स्पोर्ट्समनसह अभिनय व मॉडलिंग चे काम देखील करतो. तसेच तो सोशल मीडियावर देखील खुप अॅक्टिव्ह असतो. त्याचे अनेक चाहते आहेत.8 / 10मिस्टर इंडिया युनायटेड कॉन्टिनेन्ट 2018 चा विजेता असलेला प्रदीप खरेरा आणि मानसी नाईक वर्षभर रिलेशनशिपमध्ये होते. काही दिवसांपूर्वीच दोघांनी लग्नगाठ बांधली.9 / 10अगदी पारंपारिक पद्धतीनं मानसी-प्रदीपचे लग्न झाले. त्यांच्या लग्नाआधीच्या सोहळ्यापासून लग्नानंतरचे बरेच फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. 10 / 10लग्नानंतर मानसी सासरी हरयाणात गेली आहे. लग्नानंतरही आपली पर्सनल लाइफ ती आपल्या चाहत्यांसोबत शेअर करते आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications