Join us

IN PICS : खूपच इंटरेस्टिंग आहे राम कपूर-गौतमीची लव्हस्टोरी, पाहा रोमॅन्टिक फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 01, 2021 8:00 AM

1 / 8
बडे अच्छे लगते हैं या मालिकेमुळे घराघरात लोकप्रिय झालेला राम कपूर याचा आज वाढदिवस. काही वर्षांपूर्वी ‘कसम से’ या मालिकेत तो प्राची देसाईसोबत झळकला होता. त्यानंतर ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेने त्याच्या करियरला एक वेगळीच दिशा दिली. पण आज आम्ही तुम्हाला राम कपूरच्या प्रोफेशनल लाईफबद्दल नाही तर त्याच्या पर्सनल लाईफबद्दल सांगणार आहोत. होय, राम कपूर आणि त्याची पत्नी गौतमी यांची लव्हस्टोरी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
2 / 8
‘घर एक मंदिर’ या मालिकेत राम व गौतमीने दीर-भावजयीची भूमिका साकारली होती. पुढे या रिल लाईफ भावजयीसोबत राम कपूरने लग्नगाठ बांधली. मालिकेच्या चित्रीकरणादरम्यानच राम आणि अभिनेत्री गौतमी गाडगीळ यांच्या नात्याला सुरुवात झाली आणि दोघांची ही लव्हस्टोरी पुढे लग्नाच्या वळणावरच येऊन थांबली.
3 / 8
अर्थात लग्नापर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. कारण गौतमी व राम या दोघांच्या स्वभावात अगदी जमीनअस्मानाचा फरक होता. रामला पार्ट्या आवडायच्या. पार्टीत ड्रिंक करणाºया मुली आवडायव्या. गौतमी अगदी याविरूद्ध. याशिवाय राम व गौतमीच्या लग्नाला घरच्यांचाही विरोध होता. गौतमीलादेखील रामने पार्टीत जाणे, ड्रिंक करणे त्यांना पसंत नव्हते. पण तिला राम आवडत होता. एका संध्याकाळी रामने गौतमीला प्रपोज केले आणि गौतमीनेही लगेच होकार दिला. अर्थात ही लव्हस्टोरी इतक्या सहज पुढे जाणार नव्हती.
4 / 8
राम व गौतमीने एकमेकांना पसंत केले होते. पण परंतु रामची ही लव्हस्टोरी त्याच्या घरच्यांना अजिबातच पसंत नव्हती. त्यामुळे गौतमीबरोबर लग्न करण्यासाठी रामला घरच्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. यामागचे कारण म्हणजे गौतमीचे हे दुसरे लग्न होते. यामुळे रामच्या घरचे या लग्नाच्या विरोधात होते.
5 / 8
पण रामने घरच्यांना तयार केले आणि सर्व अडथळ्यांनंतर रिल लाईफ दीर-भावजयी 14 फेब्रुवारी 2003 रोजी व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी विवाहबंधनात अडकले. या दाम्पत्याला दोन मुले असून मुलगी सियाचा जन्म 12 जून 2006 ला झाला तर मुलगा अक्सचा जन्म 12 जानेवारी 2009 ला झाला.
6 / 8
नेहमीच मालिकेत एका परफेक्ट पतीची भूमिका साकारणारा राम कपूर रिअल लाइफमध्येदेखील परफेक्ट पती आहे. तो पत्नी गौतमीवर प्रचंड प्रेम करतो. गौतमीदेखील एक टीव्ही अभिनेत्री आहे.
7 / 8
बडे अच्छे लगते है या मालिकेत रामने साक्षी तंवरसोबत तब्ल 17 मिनिटांचा इंटिमेट सीन दिला होता. प्रेक्षक हे पाहून हैराण झाले होते. गौतमीची यावर काय प्रतिक्रिया होती?
8 / 8
तर ती एकदम कूल होती. ‘लग्नाच्या इतक्या वषार्नंतर एकमेकांवर इतका विश्वास असतो की तो कधीच कमी होऊ शकत नाही. राम आणि मीसुद्धा असेच नाते शेअर करतो. किसींग सीन शूट होण्याअगोदर रामने मला फोन करुन याची कल्पना दिली होती. एक पत्नी म्हणून मला धक्का जरुर बसला पण मी त्याविरुद्ध कधीच नव्हते..,’ असे ती एका मुलाखतीत म्हणाली होती.
टॅग्स :राम कपूर