PICS: सोनम कपूर व आनंद आहुजाची गजब प्रेमकहाणी; मित्राचे प्रपोजल घेऊन गेला अन् स्वत:च प्रेमात पडला By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2020 2:32 PM1 / 10सोनम व आनंदची लव्हस्टोरी अफलातून आहे. खरे तर आनंद त्याच्या एका मित्रासोबत सोनमला डेटवर पाठवू इच्छित होता. त्यानिमित्तानेच दोघांची भेट झाली होती.2 / 10पण सोनमला पाहताच आनंद आपल्या मित्राला विसरला आणि स्वत:च सोनमच्या प्रेमात बुडाला.3 / 102014 मध्ये सोनम आणि आनंदची पहिली नजरानजर झाली होती. दोघांचीही कॉमन फ्रेण्ड परनिया कुरैशी हिला याचे श्रेय जाते. परनिया दोघांचीही चांगली मैत्रीण आहे.4 / 10पहिल्या भेटीनंतर सोनम व आनंद एकमेकांच्या आणखी जवळ आलेत. रात्ररात्र दोघांच्या गप्पा सुरु झाल्यात.5 / 10महिनाभरानंतरच आनंदने सोनमला प्रपोज केले मे 2018 मध्ये दोघांनीही लग्न केले.6 / 10आनंद व सोनमने एकमेकांना डेट करणे सुरु केले, त्या दिवसांपासून बरोबर दोन महिन्यांनी सोनमचा वाढदिवस होता. 7 / 10सोनमच्या वाढदिवसासाठी आनंदने एक सरप्राईज प्लान केले. त्याने एक रेस्टॉरंट बुक केले आणि सोनमच्या आवडीचा मेन्यू, म्युझिक अशी सगळी जंगी तयारी केली.8 / 10सोनम रेस्टॉरंटमध्ये पोहोचताच आनंदने तिला त्याने हाताने लिहिलेले एक कार्ड गिफ्ट केले. सोनमसाठी हे सरप्राईज अविस्मरणीय ठरले. कारण यापूर्वी कुणीही कधीही तिच्यासाठी असे काही केले नव्हते.9 / 10आनंद हा एका दिल्लीचा मोठा बिझनेसमॅन आहे. त्याचे शिक्षण अमेरिकेत झाले आहे. 10 / 10 आनंद फॅशन ब्राँड इँंल्ली चा मालक आहे. आनंदची आणखी एक वेगळी ओळख म्हणजे, तो प्रसिद्ध बिझनेसमॅन हरीश अहुजा यांचा नातू आहे. आनंदचे वषाकार्ठीचे उत्पन्न अब्जावधीच्या घरात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications