Sushmit Sen Affairs: चित्रपटांपेक्षा Sushmita Senच्या अफेअर्सचीच जास्त चर्चा, पाहा अभिनेत्रीनं कोणा-कोणाला केलंय डेट By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 12:23 PM1 / 9सुष्मिता सेन (Sushmita Sen) स्वतःच्या तत्त्वांवर आयुष्य जगणारी अभिनेत्री आहे. अगदी लहान वयातच सिंगल मदर होण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्रीने दोन मुलींना दत्तक घेतल्या. 2 / 9सुष्मिता बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. पण प्रेमाच्याबातीत तिला नशिबानं फारशी साथ दिली नाही. सुष्मिताने अनेकांना डेट केलं पण कोणतचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. 3 / 9सुष्मिता वयाच्या १८-१९ व्या वर्षी विक्रम भट्टच्या प्रेमात पडली होती. मात्र, त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. इतकंच नाही तर, सुश्मितासोबत ब्रेकअप झाल्यानंतर विक्रम भट्ट यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला होता.4 / 9सुष्मिता सेन आणि वसीम अक्रम यांच्या अफेअरची खूप चर्चा झाली होती. सुष्मिताची पहिली भेट पाकिस्तानी क्रिकेटर वसीमसोबत टीव्ही शो होस्ट करताना झाली होती. वसीम अक्रम आणि सुष्मिता सेन यांचं नाते फार काळ टिकले नाही.5 / 9अभिनेत्री सुष्मिता सेन आणि अभिनेता रणदीप हुड्डा यांच्या लिंकअपच्या बातम्या अनेकदा मीडियात आल्या आहेत. 'कर्म और होली' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघे प्रेमात पडले. त्यावेळी दोघेही एकत्र दिसले होते. दोघे जवळपास तीन वर्षे डेट करत होते.6 / 92015 च्या सुमारास सुष्मिता मुंबईतील रेस्टॉरंटचा मालक हृतिक भसीनसोबतच्या अफेअरमुळे चर्चेत होती. दोघेही अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले होते पण 2017 मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले.7 / 9बंटी सचदेवसोबत सुष्मिताच्या डेटिंगच्या बातम्याही आल्या होत्या. बंटी सचदेव हा टॅलेंट कंपनीचा मालक आहे. दोघेही अनेकदा एकत्र दिसले. त्यावेळी तो सुष्मिताचा मॅनेजरही होतो.8 / 9सुष्मिता सेन आणि रोहमन शॉल यांच्या अफेअरच्या बातम्यांनी खूप चर्चेला उधाण आलं होतं. रोहमन वयाने सुष्मितापेक्षा 15 वर्षांनी लहान आहे, काही महिन्यापूर्वीचे दोघांचे ब्रेकअप झाले. रोहमन आणि सुष्मिताचे अफेअर 2018 पासून सुरू झाले आणि 2021मध्ये ब्रेकअप झालं. पण आजही सुष्मिता आणि रोहमन अनेकदा एकत्र स्पॉट होतात. 9 / 9सुष्मिताचे नाव बिझनेसमॅन आणि आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदींशी जोडलं गेलं होतं. ललित मोदी यांनी सुष्मितासोबतचा एक रोमाँटिक फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती त्यानंतर इंटरनेटवर खळबळ उडाली होती. मात्र काही महिन्यांतच दोघांचं ब्रेकअप झालं. आणखी वाचा Subscribe to Notifications