विवेक ओबेरॉय एका सिनेमासाठी घेतो 3 ते 4 कोटी मानधन, आहे इतक्या कोटींचा मालक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 16:34 IST
1 / 12बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय याचा आज वाढदिवस.2 / 12 3 सप्टेंबर 1976 रोजी जन्मलेला विवेक आज त्याचा 44 वा वाढदिवस साजरा करतोय.3 / 12विवेकचे वडील सुरेश ओबेरॉय बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत विवेक बॉलिवूडमध्ये आला.4 / 12जन्मानंतर विवेकचे नाव विवेकानंद ओबेरॉय ठेवण्यात आले होते. मात्र कालांतराने त्याने त्याचे नाव बदलून विवेक ओबेरॉय केले.5 / 12विवेकच्या फिल्मी करिअरमध्ये बरेच चढऊतार आलेत. त्याचे फिल्मी करिअर म्हणावे तसे यशस्वी ठरले नाही.6 / 12आजघडीला अगदी एखाद्या सिनेमात तो दिसतो. अर्थात पैशांची मात्र त्याच्याकडे कमतरता नाही.7 / 12विवेक कोट्यवधीच्या संपत्तीचा मालक आहे. एका रिपोर्टनुसार, त्याच्याकडे 110 कोटींची संपत्ती आहे.8 / 12एका सिनेमासाठी विवेक 3 ते 4 कोटी मानधन घेतो.9 / 12 अभिनेता असण्यासोबतच विवेक एका प्रॉडक्शन हाऊसचा मालक आहे.10 / 12त्याच्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव ‘ओबेरॉय मेगा एंटरटेनमेंट’ आहे. 11 / 12 इतकेच नाही तर कर्म इन्फ्रास्ट्रक्चर नावाची त्याची एक कंपनी आहे. या कंपनीने 2016 मध्ये महाराष्ट्रात हाऊसिंग प्रोजेक्ट लॉन्च केला होता. 12 / 122002 मध्ये राम गोपाल वर्मा यांच्या ‘कंपनी’ या सिनेमातून त्याने डेब्यू केला होता. या सिनेमासाठी त्याला बेस्ट डेब्यू आणि बेस्ट सपोर्टिंग अॅक्टरचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.