Join us

Happy Birthday Bobby : बॉबी अन् नीलमची अधुरी प्रेमकहाणी, लेकाच्या लव्हस्टोरीत 'रोमॅन्टिक हिरो' धर्मेंद्रच ठरले व्हिलन !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2023 10:27 AM

1 / 9
बॉबी देओलने १९९५ मध्ये बरसात सिनेमातून बॉलिवुडमध्ये पदार्पण केले.या सिनेमातून तो एका रात्रीत स्टार झाला. आणि हाच बॉबी नीलम कोठारीच्या प्रेमात वेडा झाला.
2 / 9
नीलम आणि बॉबी हे एकमेकांच्या प्रेमाच आकंठ बुडाले होते. दोघेही लवकरच लग्नही करतील अशा चर्चाही रंगल्या होत्या. सोबतच दोघांचे करिअरही उत्तम सुरु होते.
3 / 9
जवळपास पाच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर अचानक दोघांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा सुरु झाली. ही चर्चा खरीही होती. दोघांच्या ब्रेकअपला दोन व्यक्तींना जबाबदार ठरवले जाऊ लागले. एक म्हणजे बॉबी देओलचे वडील धर्मेंद्र आणि दुसरी व्यक्ती अभिनेत्री पूजा भट्ट.
4 / 9
सगळं सुरळीत सुरु असतानाच बॉबी आणि पूजामध्ये जवळीक वाढल्याच्या चर्चा रंगू लागल्या. तेव्हा बॉबी हा स्टार अभिनेता होता त्यामुळे साहजिकच त्याचे नाव अनेकांशी जोडले जोत होते.
5 / 9
मात्र नीलमने या सर्व बातम्यांवर पडदा टाकला. नीलमने एका मुलाखतीत खुलासा केला की,'हो आमचे नाते तुटले पण याचा पूजा भट्टशी काहीच संबंध नाही. या सर्व अफवा आहेत त्या मी दूर करु इच्छिते.'
6 / 9
या खुलाश्यात नीलमने धर्मेंद्र यांच्याबाबत बोलणं मात्र साफ टाळलं. पण खरं तर धर्मेंद्र यांच्यामुळेच बॉबी आणि नीलम एकत्र येऊ शकले नाहीत असं नंतर समोर आलं.
7 / 9
धर्मेंद्र यांना चित्रपटात काम करणारी सून म्हणून नको होती अशी एक चर्चा आहे. म्हणूनच बॉबीने वडिलांचं ऐकत नीलमपासून तो दूर झाला आणि त्यांच्या नात्याला पूर्णविराम मिळाला.
8 / 9
नंतर दोघेही त्यांच्या आयुष्यात पुढे गेले. बॉबीचे चित्रपट फारसे काही कमाल दाखवू शकले नाहीत तर नीलम आणि गोविंदाची जोडी चांगलीच हिट होत होती.
9 / 9
यानंतर नीलम कोठारीने २०११ मध्ये समीर सोनीसोबत लग्नगाठ बांधली तर बॉबी तान्या देओलसह विवाहबद्ध झाला.
टॅग्स :बॉबी देओलधमेंद्रदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट