कमी मानधन घेऊन केलं मालिकेत काम, आज गाजवतोय बॉलिवूड; 'या' अभिनेत्याची संघर्षगाथा वाचाच By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 2:19 PM1 / 8छोट्या पडद्यावरील मालिकेत काम करणाऱ्या या अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. 'बालिका वधू' ते 'गॅसलाईट' असा त्याचा टीव्ही ते सिनेमा प्रवास आहे. आजच्या घडीला या अभिनेत्याच्या '१२ वी फेल' चित्रपटाची क्रेझ सर्वत्र पाहायला मिळते आहे. 2 / 8बालिका वधू या मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदापर्ण करत अभिनेता विक्रम मेस्सीने यशाला नवी गवसाणी घातली आहे. आतापर्यंत पाहिलं तर मालिकाविश्वातील असे काही मोजकेच चेहरे आहेत जे मोठ्या पडद्यावर चमकले.या यादीमध्ये येणारं नाव म्हणजे अभिनेता विक्रांत मेस्सी होय. 3 / 8अभिनेता विक्रांत मेस्सी हा सध्या '१२वी फेल या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. त्याच्या या चित्रपटाच्या यशाने सर्वजण थक्क झाल्याचं पाहायला मिळतंय. बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवनवे विक्रम मोडत '१२वी फेल चित्रपटाची यशस्वी घौडदोड सुरुच आहे. 4 / 8अभिनय क्षेत्रात मिळेल त्या संधीचं सोनं करत उत्तम पात्र साकारत विक्रांत मेस्सी प्रकाशझोतात आला. आपल्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांनी विशेष दादही दिली. 5 / 8'१२ वी फेल' अभिनेत्याने त्याच्या करिअरच्या प्रारंभीच्या काळात छोट्या पडद्यावर आपल्या अभिनयाची चमक दाखवत चाहत्यांची मनं जिंकली. पण एक वेळ अशी होती ज्यावेळी या अभिनेत्याला एका सिनेमात त्याच्या सहकलाकारापेक्षा कमी मानधन देण्यात आलं होतं. 6 / 8विक्रांतने 'छपाक' या सिनेमात अभिनेत्री दीपिका पदुकोण बरोबर काम केलं होतं. मात्र या सिनेमात त्याला दीपिकापेक्षा फार कमी मानधन मिळालं. एका मुलाखतीत त्याने हा खुलासा केला. फिल्म इंडस्ट्री मिळणाऱ्या मानधनात किती तफावत आहे याविषयी विक्रांत मेस्सीने बातचीत केली होती.7 / 8लुटेरा’, ‘दिल धडकने दो’, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’, ‘छपाक’, ‘कार्गो’, ‘गिन्नी वेड्स सनी’, ‘हसीन दिलरुबा’ अशा अनेक चित्रपटांत त्यानं साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांना आवडल्या.8 / 8दिग्दर्शक विधु विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाने विक्रांत मेस्सीसह नॅशनल क्रश मेधा शंकरला नवी ओळख मिळवून दिली. त्यांच्या अभिनयाचं सर्वस्तरातून कौतुक केलं जातंय. आणखी वाचा Subscribe to Notifications