Join us

बिल, ईएमआय भरायचेही नव्हते पैसे, घरोघरी जाऊन मागितलं काम; अभिनेत्याची झालेली अशी अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 2:04 PM

1 / 8
बॉलिवूडमध्ये हँडसम, चार्मिंग आणि चॉकलेट बॉय म्हणून ओळख असलेल्या अभिनेत्यांमध्ये डिनो मोरियाचं (Dino Morea) नाव आवर्जुन घेतलं जातं. डिनो भले ही फिल्मइंडस्ट्रीत फ्लॉप ठरला पण त्याने राज, बाज यारखे काही हिट सिनेमेही दिले.
2 / 8
मात्र डिनोच्या करिअरमध्ये असा काळ आला जेव्हा त्याला काम मिळणंच बंद झालं होतं. तो काळ होता 2010-11 सालचा. तेव्हा डिनो मोरियाच्या हातात एकही फिल्म नव्हती. त्याला छोट्या मोठ्या कोणत्याच भूमिकेसाठी विचारणा होत नव्हती.
3 / 8
अशा परिस्थितीत डिनोवर वाईट वेळ आली होती. हातात कामच नसल्याने त्याच्यावर बिल्स, ईएमआय भरणंही कठीण झालं होतं. कारण अकाऊंटमध्ये पुरेसे पैसेच नव्हते. घरदार चालवणं कठीण झालं होतं. अशा वेळी डिनो स्वत:च समोर जाऊन काम मागण्याचं ठरवलं.
4 / 8
त्यावेळी डिनो अनेक दिग्दर्शक, निर्मात्यांकडे गेला. मला काम द्या असंच त्याने स्पष्टपणे सांगितलं. मात्र तरीही त्याला काम मिळेना. कोणीच पुढे आलं नाही. मग घर कसं चालवणार असं असताना त्याने टीव्ही शो, इव्हेंट होस्ट केले.
5 / 8
काही दिवसांपूर्वीच डिनोने पुन्हा अभिनय क्षेत्रात कमबॅक केलं आहे मात्र ते ओटीटीवर. 'तांडव' आणि 'द एम्पायर' अशा काही सिरीजमध्ये तो झळकला. 'द एम्पायर' मध्ये त्याने खलनायकाची भूमिका साकारली. या भूमिका त्याला आजपर्यंत कधीच मिळाल्या नव्हत्या.
6 / 8
या सिरीजनंतर डिनो मोरिया पुन्हा ओटीटीपासून दूर गेला असला तरी तो लवकरच तेलुगू फिल्म इंडस्ट्रीत डेब्यू करत आहे. 'एजंट' या त्याच्या तेलुगू सिनेमाचं ट्रेलर नुकतंच प्रदर्शित झालं आहे.
7 / 8
फिल्म इंडस्ट्रीत नशीब आजमवल्यानंतर डिनोने रेस्टॉरंटची चेन सुरु केली. 'क्रेप स्टेशन' हे रेस्टॉरंट संपूर्ण भारतात फेमस आहे. 47 वर्षीय डिनो ने 'प्यार मे कभी कभी' या सिनेमातून पदार्पण केलं होतं. मात्र हा चित्रपट बॉक्सऑफिसवर जोरदार आपटला.
8 / 8
डिनो आणि बिपाशा बासूचं प्रेमप्रकरण चर्चेत होतं. सुपरहिट 'राज' सिनेमाच्या शूटिंगवेळी दोघांची मैत्री झाली. अनेक वर्ष ते रिलेशनशिपमध्ये होते. दोघांनी एकमेकांचा स्ट्रगल अगदी जवळून बघितला आहे. मात्र काही वर्षांनी त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या.
टॅग्स :डिनो मोरियाबॉलिवूड