इंजिनीअरिंगचे क्लास बंक करुन दिल्या फिल्म ऑडिशन्स,आज आहे बॉलिवूडचा आघाडीचा नायक By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 11:50 AM1 / 7हिंदी सिनेसृष्टीत गॉडफादरशिवाय स्टार बनलेल्या कलाकारांच्या यादीत कार्तिक आर्यनच्या नावाचा समावेश आहे. अनेक सिनेमांमधून त्याने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत.अभियांत्रिकीचे शिक्षण अर्धवट सोडून कार्तिकने स्वबळावर बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले.2 / 7बॉलिवूडमधील सध्या आघाडीचा अभिनेता म्हणून कार्तिक आर्यनकडे पाहिलं जातं. 'प्यार का पंचनामा' या सिनेमामुळे त्याला बॉलिवूडमध्ये ओळख मिळाली. फार कमी वेळेत कार्तिक आर्यनने आपला मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. 'सोनू के टिटू की स्विटी' या सिनेमाने त्याचे करिअर वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.3 / 7बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणजेच अभिनेता कार्तिक आर्यन इंडस्ट्रीतील सर्वांचा लाडका आहे. आज कार्तिक आर्यन ३३ वर्षांचा झाला आहे. मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर या ठिकाणी कार्तिक आर्यनचा जन्म झाला आहे. सिनेसृष्टीशी संबंध नसतानादेखील या अभिनेत्याने स्वतःच्या अभिनय कौशल्यावर हा मोठा टप्पा गाठला आहे. 4 / 7 एकेकाळी इंजिनीअरिंगचे वर्ग बंक करून अभिनेता कार्तिक आर्यन चित्रपटांच्या ऑडिशनला जायचा. बराच काळ संघर्ष केल्यानंतर ‘प्यार का पंचनामा’ या चित्रपटात त्याला काम करण्याची संधी मिळाली. 5 / 7तसेच एकापाठोपाठ एक सुपरहिट सिनेमे देत बॉलिवूडमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे.अपार कष्ट,मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर कार्तिकने हे यश मिळवलं आहे.गेल्या वर्षी प्रदर्शित झालेला भूल भुलैया हा त्याचा चित्रपट सुपरहिट ठरला. शिवाय कार्तिक आर्यन म्हणजे हिंदी सिनेसृष्टीतील उगवता तारा असं अनेकांचे म्हणणे आहे. 6 / 7कार्तिक आर्यनचा अभिनेता बनण्याचा प्रवास कठीण होता. त्याने सलग तीन वर्षे ऑडिशन दिल्या होत्या. परंतु या ऑडिशनमध्ये कधी त्याला लुक्समुळे तर कधी अनफिट असल्याच्या कारणावरुन नकार देण्यात आला होता. १२ वर्षांआधी फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवण्याआधी या अभिनेत्याला प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. 7 / 7'शहजादा' ,'भूल भुलैया २' ,'सोनु के टिटु की स्वीटी' अशा चित्रपटांमधून आपल्या अभिनयाची जादु करत कार्तिक आर्यनने चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications