प्रसिद्ध अभिनेत्यावर झाला लैंगिक अत्याचार; बऱ्याच वर्षांनी सत्य आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2023 12:41 PM2023-03-05T12:41:38+5:302023-03-05T12:47:34+5:30

Piyush mishra: सातवीमध्ये असताना त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं त्यांनी उघडपणे सांगितलं.

प्रसिद्ध गायक, गीतकार आणि अभिनेता पियुष मिश्रा सध्या त्यांच्या 'तुम्हारी औकात क्या हैं पियुष मिश्रा' या आत्मचरित्रामुळे चर्चेत येत आहेत.

पियुष मिश्रा यांनी २००० साली आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली.

विशाल भारद्वाज यांच्या 'मकबूल', अनुराग कश्यप यांचा 'गुलाल' आणि २०१२ सालचा 'गॅग्स ऑफ वासेपूर' या चित्रपटांमधून खऱ्या अर्थाने ओळख मिळाली.

आपल्या अभिनयामुळे आणि गीतांमुळे ओळखले जाणारे पियुष सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत.

बिंधास्तपणे आयुष्य जगणाऱ्या पियुष यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टींचे खुलासे केले आहेत. यामध्येच त्यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे.

अलिकडेच पियूष मिश्रा यांनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं सांगितलं.

सातवीमध्ये असताना त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं त्यांनी या मुलाखतीत सांगितलं. तसंच त्यांच्या आत्मचरित्रामध्येही याविषयीचा उल्लेख असल्याचं म्हटलं जातं.

"जवळपास ५० वर्षांपूर्वी आमच्या नात्यातील एका महिलेने माझ्यावर अत्याचार करायचा प्रयत्न केला होता. या प्रकाराचा परिणाम माझ्या मनावर इतका झाला होता की बरीच वर्ष मी त्या भीतीखाली जगत होतो,"

'तुम्हारी औकात क्या हैं पियुष मिश्रा' या आत्मचरित्रामध्ये पियुष यांनी अनेक गोष्टींचा उलगडा केला आहे. अगदी त्यांच्या फिल्मी करिअरपासून ते कुटुंबापर्यंत अनेक गोष्टींचा यात समावेश आहे.