आर माधवनच्या मुलानं देशासाठी पुन्हा जिंकली ५ गोल्ड मेडल्स; सेलिब्सही म्हणाले, “आम्हाला अभिमान..” By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2023 1:52 PM1 / 8अभिनेता आर. माधवनच्या मुलानं पुन्हा एकदा भारताचं नाव मोठं केलं आहे. आर. माधवनचा मुलगा वेदांतनं देशासाठी एक नाही तर पाच सुवर्णपदकं जिंकली आहेत. 2 / 8आर. माधवनचा मुलगा वेदांत यानं जलतरण स्पर्धेत पाच सुवर्णपदकं जिंकली. इतर स्टार किड्स चित्रपटांमध्ये नशीब आजमावण्याचे प्रयत्न करताना दिसतात. मात्र आर. माधवनचा मुलगा वेदांत देशाला पदकं मिळवून देत आहे. 3 / 8आर माधवनच्या मुलानं सुवर्ण कामगिरी केली असून क्रीडाविश्वात त्याचं नावंही मोठं होत आहे. वेदांत चॅम्पियनशिपमध्ये एकापाठोपाठ एक पदके जिंकत सर्वांसमोरच एक आदर्श ठेवत आहे.4 / 8वेदांत माधवननं अलीकडेच ५८ व्या MILO/MAS मलेशिया इन्व्हिटेशनल एज ग्रुप स्विमिंग स्पर्धेत भाग घेतला. यामध्ये वेदांतनं ५० मीटर, १०० मीटर, २०० मीटर, ४०० मीटर आणि १२०० मीटर जलतरण स्पर्धेत भाग घेतला आणि चमकदार कामगिरीही केली. 5 / 8आर. माधवननं यासंदर्भात माहिती सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. तसंच यासोबत त्यानं काही फोटोही शेअर केलेत. ज्यात त्याचा मुलगा वेदांतच्या गळ्यात पाच सुवर्णपदकं आहेत आणि तिरंग्यासोबत उभा आहे.6 / 8यातील एका फोटोमध्ये त्याची आई सरिता वेदांतसोबत दिसत आहे. आर. माधवनने सोशल मीडियावर फोटो शेअर करून आनंद व्यक्त करताच सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला. टिस्का चोप्रा, लारा दत्ता, झुबेर खानपासून ते तमिळ चित्रपटांची स्टार सुरियानं देखील त्याचं अभिनंदन केलंय.7 / 8यापूर्वी, वेदांतने फेब्रुवारी २०२३ मध्ये 'खेलो इंडिया युथ गेम्स'मध्ये ५ सुवर्ण आणि रौप्य पदकांसह ७ पदके जिंकली होती. वेदांतनं या स्पर्धेत महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं होतं. 8 / 8आर. माधवनचा मुलगा वेदांत जलतरणपटू असून त्याला त्यात करिअर करायचं आहे. २०२२ मध्ये, वेदांतनं ज्युनियर नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये १५०० मीटर फ्रीस्टाइल स्पर्धा जिंकली. आणखी वाचा Subscribe to Notifications