Ranbir Kapoor : 'या' दुर्मिळ आजाराने ग्रस्त आहे रणबीर कपूर; झटपट खाण्याची आणि पटापट बोलण्याची सवय By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2023 1:23 PM1 / 8बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर लहानपणापासून एका आजारासह जगत आहे. आपण अनेकदा आपल्या वेदना लपवतो. त्याचा आजार अत्यंत दुर्मिळ आहे. यामुळेच रणबीर लवकर लवकर जेवतो आणि पटापट बोलतो. 2 / 8रणबीर कपूरचे डायलॉग्स खूप फास्ट होतात हे तुम्ही अनेक वेळा चित्रपटांमध्ये पाहिलं असेल. अनेकवेळा पत्रकार परिषदेत प्रश्नांची उत्तरे देताना तो पटापट बोलू लागतो. रणबीर कपूरला ज्या आजाराने ग्रासले आहे त्याचे नाव नेजल सेप्टम (Nasal Septum) आहे. 3 / 8या आजारात श्वास घेण्यास त्रास होणे, घोरणे आणि सायनसचा त्रास होतो. रणबीर कपूर नेजल सेप्टम या दुर्मिळ आजाराने त्रस्त आहे. हे फार कमी लोकांमध्ये आढळते. या आजारात नाकाचे हाड थोडं वाकडं होतं, त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो. 4 / 8आजाराची लक्षणं फारशी गंभीर नाहीत. तथापि, काही प्रकरणांमध्ये वारंवार सायनस संक्रमण होण्याचा मोठा धोका असतो. नेजल सेप्टमच्या आजारावर शस्त्रक्रियेद्वारे उपचार केले जाऊ शकतात. 5 / 8सेप्टोप्लास्टी शस्त्रक्रियेने नेजल सेप्टम बरं केलं जाऊ शकतं परंतु रणबीर कपूरने उपचार करण्यास नकार दिला आहे. 2009 मध्ये, जेव्हा एका चित्रपट दिग्दर्शकाने त्याला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला तेव्हा रणबीरने नकार दिला आणि सांगितले की तो खूप आनंदी आहे.6 / 8रणबीर कपूरला ज्या दुर्मिळ आजाराने ग्रासले आहे त्या नेजल सेप्टमचे काही दुष्परिणाम देखील दिसून आले आहेत. यामध्ये चेहऱ्यावर सूज येणं, नाक दुखणं, डोकेदुखी, सूज येणं, डोळ्याभोवती दुखणे अशा समस्या उद्भवू शकतात. 7 / 8सहसा या समस्या एक-दोन दिवसांत निघून जातात, परंतु काहीवेळा ही सूज अनेक महिने टिकून राहते. नेजल सेप्टम केवळ शस्त्रक्रियेने बरा होऊ शकतो. अभिनेत्याच्या या आजाराबद्दल फार कमी लोकांना माहीत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 8 / 8 आणखी वाचा Subscribe to Notifications