Join us

Photos: दिल्लीमध्येही आहे किंग खानचं आलिशान घर; मन्नतप्रमाणेच सजवलाय घरातील एक-एक कोपरा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2022 10:27 AM

1 / 10
गेल्या कित्येक वर्षांपासून अभिनेता शाहरुख खान प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. केवळ देशातच नाही तर विदेशातही त्याची क्रेझ पाहायला मिळते.
2 / 10
'मैं हूँ ना', 'येस बॉस', 'दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे' अशा कितीतरी चित्रपटांमध्ये अभिनय करुन त्याने त्याचं नाव प्रेक्षकांच्या मनावर कोरलं आहे.
3 / 10
उत्तम अभिनयशैलीमुळे प्रेक्षकांची मनं जिंकरणाऱ्या शाहरुखविषयी, त्याच्या कुटुंबाविषयी आणि खासकरुन त्याच्या संपत्तीविषयी जाणून घेण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात.
4 / 10
शाहरुखचा मुंबईस्थित मन्नत या बंगल्याविषयी सगळ्यांनाच ठावूक आहे. परंतु, या बंगल्याव्यतिरिक्त अनेक ठिकाणी त्याची प्रॉपर्टी असून आज आपण त्याच्या दिल्लीतील घराविषयी जाणून घेऊयात.
5 / 10
शाहरुखचं दिल्लीतदेखील एक आलिशान घरं असून हे घर शाहरुखची पत्नी गौरी खान हिने डिझाइन केल्याचं म्हटलं जातं.
6 / 10
घरातील प्रत्येक कोपरा खास असावा यासाठी खूप विचारपूर्वक या घराचं इंटेरिअर करण्यात आलं आहे.
7 / 10
शाहरुखच्या दिल्लीतील घरात प्रत्येक रुम मोठी प्रशस्त असल्याचं पाहायला मिळतं.
8 / 10
लिव्हिंग रुपममध्येही सजावटीची पुरेपूर काळजी घेण्यात आल्याचं या फोटवरुन लक्षात येतं.
9 / 10
या घरात शाहरुख आणि त्याच्या कुटुंबाचे काही जुन्या फोटोफ्रेम लावल्या असून हा त्यांच्या आठवणींचा कप्पा असल्याचं म्हटलं जातं.
10 / 10
शाहरुखच्या घरातील आलीशान बेडरुम
टॅग्स :शाहरुख खानबॉलिवूडसेलिब्रिटीगौरी खान