महिन्याला कमावायचा फक्त ७ हजार, अभिनयामुळे नशीबच पालटलं! आज 'हा' अभिनेता आहे कोट्यवधींचा मालक By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 4:41 PM1 / 6सिद्धार्थ मल्होत्रा हा बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक आहे. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सिद्धार्थने बॉलिवूडमधील करिअरला सुरुवात केली होती. आज कोट्यवधींचा मालक असणारा सिद्धार्थची पहिली कमाई किती होती तुम्हाला माहिती आहे. 2 / 6२०१२ साली त्याने सुप्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून पदार्पण केलं होतं. पहिल्याच चित्रपटाने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर सिद्धार्थने ‘एक व्हिलन’, ‘हसी तो फसी’, ‘मरजावा’, ‘कपूर अॅण्ड सन्स’ या चित्रपटातून अभिनयाची छाप पाडली. 3 / 6२०२१ साली प्रदर्शित झालेल्या ‘शेरशाह’ चित्रपटामुळे सिद्धार्थ प्रसिद्धीझोतात आला. आज बॉलिवूडचा हॅंडसम हंक म्हणून ओळख असलेल्या अभिनेत्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. हिंदी मनोरंजन सृष्टीत असे काही मोजकेच चेहरे आहेत ज्यांना अभिनयाची कोणतीही पार्श्वभूमी नसतानाही त्यांनी मनोरंजन विश्वात आपली ओळख निर्माण केली.4 / 6या अभिनेत्याने वयाच्या १८व्या वर्षापासून मॉडेलिंग सुरू केलं होतं. सिद्धार्थने मॉडेलिंगमध्ये मोठं यश मिळवलं. मॉडेलिंगसाठी त्याची पहिली कमाई सात हजार रुपये होती. सिद्धार्थला अभिनय क्षेत्रात करिअर करायचे होते. त्यासाठी त्याने मॉडेलिंगला रामराम केला.5 / 6अभिनय क्षेत्रात काहीतरी करुन दाखवण्याची प्रबळ इच्छशक्ती त्याला झोपू देत नव्हती. मुंबईत कोणताही गॉडफादर नसताना इंडस्ट्रीमध्ये आपली वेगळी ओळख या अभिनेत्याने निर्माण केली आहे.6 / 6मीडिया रिपोर्टनुसार,एकेकाळी सात हजार रुपये पहिली कमाई असणारा सिद्धार्थ आज कोट्यवधींचा मालक आहे. सिद्धार्थची एकूण संपत्ती १०५ कोटी रुपये असल्याची माहिती. सिद्धार्थची महिन्याची कमाई ५० लाखांहून अधिक आहे, तर वर्षाला तो ६ कोटी रुपये कमावतो. आणखी वाचा Subscribe to Notifications