Join us

'वेड तुझा प्रणय हळवा…' जिनिलियाच्या हटके फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2024 1:58 PM

1 / 7
महाराष्ट्राची लाडकी सूनबाई म्हणून जिनिलियाला ओळखलं जातं. जिनिलियाने तिच्या आजवरच्या सिनेसृष्टीच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटात काम केलं आहे.
2 / 7
जिनिलियाने बॉलिवूड, तेलगू आणि तमिळ सिनेमांमध्ये काम केलं आहे. सिनेसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री जिनिलिया डिसूजाच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत.
3 / 7
लोकप्रिय अभिनेत्री जिनिलिया देशमुखची सोशल मीडियावर अनेकदा चर्चा रंगलेली असते. आपल्या खासगी आयुष्यातील अपडेट्स ती यामार्फत चाहत्यांसोबत शेअर करत असते.
4 / 7
फिल्मी दुनियेत जिनिलियाला एका जाहिरातीतून खरी ओळख मिळाली. ही जाहिरात जिनिलियाने अमिताभ बच्चन यांच्यासोबत केली होती. त्यावेळी जिनिलिया फक्त १५ वर्षांची होती. यानंतर जिनिलियाने २००३ मध्ये 'तुझे मेरी कसम' या चित्रपटातून पदार्पण केले.
5 / 7
'तुझे मेरी कसम' या सिनेमाच्या सेटवर रितेश आणि जिनिलिया दोघांचे सूत जुळले. ३ फेब्रुवारी २०१२ रोजी रितेश आणि जिनिलियाचं लग्न झालं आणि ही बॉलिवूड अभिनेत्री लातूरची सूनबाई झाली.
6 / 7
२०२३ मध्ये स्टारर रितेश देशमुखसह जिनिलिया यांच्या 'वेड' सिनेमाने मराठी मनोरंजन विश्व गाजवलं. या जोडप्यानं अख्या महाराष्ट्राला त्यांच्या अभिनयानं वेड लावलं.
7 / 7
सध्या जिनिलियाने तिच्या सोशल मीडिया हॅंडलवरून काही फोटो शेअर केलेत. पारंपरिक वेशभूषेत अभिनेत्री फारच सुंदर दिसतेय. तिच्या या हटके स्टाईलची सगळीकडे चर्चा होत आहे.'Break the trends Put on traditional' असं लक्षवेधी कॅप्शन जिनिलियाने या फोटोंना दिलंय.
टॅग्स :जेनेलिया डिसूजाबॉलिवूड