बाळाच्या जन्मानंतर आला एकटेपणा, 'ते ४ आठवडे...' बॉलिवूड अभिनेत्रीने केला खुलासा By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2023 8:58 AM1 / 9प्रेग्नंसी आणि बाळाला जन्म दिल्यानंतर महिलांमध्ये अनेक शारिरीक आणि मानसिक बदल घडतात. बाळाच्या येण्याचा आनंदही असतो मात्र दुसरीकडे अनेक समस्यांनाही तोंड द्यावं लागतं. नुकतंच एका बॉलिवूड अभिनेत्रीने तिच्या या भावना व्यक्त केल्या आहेत.2 / 9दृश्यम फेम अभिनेत्री इशिता दत्ता नुकतीच आई झाली आहे. इशिताने सोशल मीडियावरुन तिच्या प्रेग्नंसीदरम्यानचे अनेक व्हिडिओ पोस्ट केले. यामध्ये ती पती वत्सल सेठ आणि कुटुंबासोबत खूपच खूश दिसत होती. 19 जुलै रौजी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला.3 / 9इशिता आणि वत्सल दोघांचेही कुटुंब आनंदात होते. मुलाच्या येण्याने घरात नवं चैतन्य आलं होतं. दरम्यान इशिताला पतीची आणि दोन्ही कुटुंबाची साथ मिळत होती. मात्र तरी डिलीव्हरीनंतरचे ४ आठवडे खूपच कठीण गेल्याचं तिने नुकतंच सांगितलं.4 / 9३३ वर्षीय इशिता म्हणाली,'मी पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये गेले होते. आता मी हळू हळू त्यातून सावरत आहे. मात्र तो एक महिना माझ्यासाठी खूपच कठीण होता. मला धड झोपता येत नव्हतं आणि ना अन्न जात होतं.'5 / 9इशिता व्हिडिओ शेअर करत पुढे म्हणाली, 'मी दिवसरात्र झोपूच शकत नव्हते. नीट जेवणही करत नव्हते. सतत काही ना काही दुखत राहायचं. स्वत:च्या शरिराला आराम देता येत नव्हता. मी शारिरीक आणि मानसिक दोन्ही दृष्टीने थकायचे.'6 / 9'इतकंच नाही तर मी अगदी बाळाला दूधही पाजू शकत नव्हते. यामुळे मला अजूनच अपराधी वाटायला लागलं होतं. आयुष्य पूर्णपणे बदललं. मला खूप एकटेपणा जाणवायला लागला. अख्खं कुटुंब माझ्यासोबत होतं तरी मला एकटं वाटायचं', असं ही ती म्हणाली.7 / 9पतीचं कौतुक करताना इशिता म्हणाली, 'मी खूप नशिबवान आहे की मला वत्सलसारखा नवरा मिळाला. तो फक्त चांगला नवरा आणि बापच नाही तर एक चांगला मित्रही आहे. माझ्या डिप्रेशनच्या काळात तो मला उठवून लाँग ड्राईव्हवर न्यायचा. कधी कॉफी डेटवर घेऊन जायचा.'8 / 9ती पुढे म्हणाली, 'आम्हाला आमचा वेळ मिळावा म्हणून कुटुंबातील इतर लोक बाळाकडे पाहायचे. त्यामुळे आम्ही निश्चिंत होऊन जायचो. माझे आईबाबा, सासू सासरे सगळ्यांनीच आम्हाला सांभाळून घेतलं.'9 / 9नव्यानेच आई झालेल्या महिलांना इशिताने सल्ला दिला. जर तुम्हाला रडावं वाटत असेल, एकटं वाटत असेल तर यात काहीच चूक नाही. सर्व वडिलांना एकच आवाहन की अशा वेळेस आपल्या पत्नीसोबत थांबा, तिला धीर द्या, सगळं ठीक होईल सांगा. थोडा वेळ द्या शेवटी सगळं ठीक होतं. आणखी वाचा Subscribe to Notifications