Join us  

एकेकाळी 'TV'वर सहाय्यक अभिनेत्रीचं केलं काम, आज आहे बॉलिवूडची टॉप अ‍ॅक्ट्रेस; कोण आहे ती ?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 4:58 PM

1 / 8
बॉलिवूडच्या झगमगत्या विश्वात कोणाचाही निभाव लागणं ही फार मोठी गोष्ट समजली जाते. या चंदेरी दुनियेत संघर्ष करणं कुणालाही चुकलेलं नाही. आज आपण अशाच एका अभिनेत्रीच्या सिनेसृष्टीतील प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. ही अभिनेत्री म्हणजे मृणाल ठाकूर.
2 / 8
'कुमकुम भाग्य' या मालिकेने अभिनेत्री मृणाल ठाकूरला वेगळीच ओळख मिळवून दिली. सध्या बॉलिवूडच्या आघाडीच्या नायिकांमध्ये तिचं नाव येतं.
3 / 8
मृणाल ठाकूरने २०१२ मध्ये 'मुझसे कुछ कहती ये खामोशियॉं' या मालिकेच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवंल. पण 'कुमकुम भाग्य' मालिकेमुळे तिला लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिने 'बुलबुल' ही व्यक्तिरेखा साकरली होती.
4 / 8
'कुमकुम भाग्य' मध्ये तिने सहाय्यक अभिनेत्रीचं काम केलं होतं. खरंतर या मालिकेच्या मुख्य भूमिकेसाठी मृणालने ऑडिशन दिली होती. पण, तिला सहाय्यक अभिनेत्रीचा रोल मिळाला.
5 / 8
यामुळे बरेच दिवस अभिनेत्री डिप्रेशनमध्ये होती. याचा खुलासा तिने एका मुलाखतीमध्ये केला होता. मुख्य भूमिकेत काम करण्याची संधी मिळावी यासाठी तिने बरेच प्रयत्न केले.
6 / 8
परंतु प्रेक्षकांना 'बुलबुल'ची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली आणि त्यामुळे तिने मुख्य भूमिकेचा अट्टहास सोडला. त्यानंतर मृणालने कधीच मागे वळून पाहिलं नाही.
7 / 8
२०१८ मध्ये आलेल्या 'लव्ह सोनिया' या आंतरराष्ट्रीय सिनेमात ती झळकली. त्यामध्ये तिने केलेल्या कामाचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं. अलिकडेच ती 'सीतारामम' या सिनेमामुळे चर्चेत होती.
8 / 8
मृणालने 'सुपर ३०',' द फॅमिली स्टार', 'कल्की' या हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच अभिनेत्री प्रभासच्या आगामी 'फौजी' या चित्रपटामध्ये दिसणार असल्याचं वृत्त आहे.
टॅग्स :मृणाल ठाकूरबॉलिवूडसेलिब्रिटीप्रेरणादायक गोष्टी