Join us

चित्रपटात काम करण्यापूर्वी 'या' ४ अभिनेत्री ठेवतात विचित्र अटी; सनी लिओनीची अट ऐकून जाल चक्रावून

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 11:24 AM

1 / 9
कलाविश्वातील प्रत्येक सेलिब्रिटी त्यांच्या प्रोफेशनल लाइफमुळे चर्चेत येत असतात. त्यात त्यांचे चित्रपट, त्यांचा अभिनय या सगळ्याची चर्चा होते. परंतु, कलाविश्वातील काही अभिनेत्री त्यांच्या विचित्र अटींमुळे चर्चेत येत आहे. बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत. ज्या चित्रपट साईन करण्यापूर्वी एक अट दिग्दर्शकासमोर ठेवतात.
2 / 9
करीना कपूर खान- अभिनेत्री करीना कपूर खान तिच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल लाइफमुळेही अनेकदा चर्चेत येत असते. कमी वयात करिअरची सुरुवात करणारी करीना आज बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेंत्रीपैकी एक आहे. २०१३ मध्ये करीनाने अभिनेता सैफ अली खानसोबत लग्न केलं. त्यानंतर तिने चित्रपट करतांना दिग्दर्शकांसमोर काही अटी ठेवण्यास सुरुवात केली.
3 / 9
यात तिने नो किसिंग पॉलिसी ही अट ठेवली आणि आजही ती कोणताही चित्रपट करतांना ही अट ठेवते. इतकंच नाही तर किसिंग सीनसोबतच आता तिने सेक्शुअल सीनदेखील करण्यास नकार दिला आहे. जो दिग्दर्शक या अटी मान्य करेल त्याच प्रोजेक्टमध्ये करीना काम करते.
4 / 9
सोनाक्षी सिन्हा - बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. परंतु, प्रत्येक चित्रपट करतांना तिची एक अट असते.
5 / 9
या अटीनुसार, ती कोणत्याही चित्रपटात किसिंग सीन देणार नाही. जर तिची ही अट मान्य असेल तरच ती कॉन्ट्रॅक्ट साईन करते.
6 / 9
कंगना रणौत - आपल्या अभिनयापेक्षा वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे कंगना रणौत.
7 / 9
कंगनाला चित्रपटासाठी देण्यात येणारं संपूर्ण मानधन दिल्यानंतरच दिग्दर्शक, निर्माते तो चित्रपट रिलीज करु शकतात, अशी ती अट ठेवते. जोपर्यंत कंगनाला सगळे पैसे मिळत नाही तोपर्यंत ती चित्रपट प्रदर्शित होऊ देत नाही.
8 / 9
सनी लिओनी - पॉर्न इंडस्ट्रीला रामराम करत बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी सनी लिओनी आज लोकप्रिय अभिनेत्रींमध्ये एक असल्याचं पाहायला मिळतं. विशेष म्हणजे स्वभावाने अत्यंत साधी असलेल्या सनीची अटदेखील तशीच आहे.
9 / 9
चित्रपटाच्या सेटवर किंवा ओव्हर ऑल सगळ्यांनी तिचा योग्य तो मान ठेवावा. तसंच लिप लॉक करण्याचा निर्णयदेखील तिला ज्यावेळी योग्य वाटेल त्याचवेळी ती घेईल.
टॅग्स :सेलिब्रिटीसनी लिओनीकरिना कपूरसोनाक्षी सिन्हाकंगना राणौतबॉलिवूडसिनेमा