1 / 8'दांडिया क्वीन' फाल्गुनी पाठकचं 'याद पिया की आने लगी' हे गाणं आठवत असेलच. या गाण्यात दिसलेली अभिनेत्री रिया सेन (Riya Sen) आठवतेय का? राजघराण्यात जन्माला आलेल्या रियाचं एका चुकीमुळे करिअर बर्बाद झालं होतं. 2 / 8फाल्गुनी पाठकच्या अल्बममध्ये दिसलेली रिया सेन त्यावेळी केवळ १७ वर्षांची होती. 1988 साली हा अल्बम रिलीज झाला होता. तर आज तिचं वय ४२ वर्षे आहे.3 / 8रियाने बालकलाकार म्हणून अभिनयात पदार्पण केले होते. वयाच्या ५ व्या वर्षीच तिने १९९१ साली 'विषकन्या' सिनेमात बालकलाकाराची भूमिका केली होती. यामध्ये तिने तिची आई मूनमून सेनसोबत काम केले होते.4 / 8रिया याही वयात कमालीची फीट आहे. रियाने 'अपना सपना मनी मनी' सिनेमात काम केले होते. २००१ साली आलेल्या 'स्टाईल' या सिनेमामुळे ती प्रसिद्ध झाली होती.5 / 8यानंतर तिने झंकार बीट्स, मल्याळम सिनेमा अनंताभद्रम, नौका डुबी सारख्या सिनेमातही काम केले. नौका डुबी तील अभिनयासाठी तिला बेस्ट अॅक्ट्रेस कॅटेगिरीत स्टार गाई़ड अवॉर्ड मिळाला होता. 'रब्बा मै क्या करु' सिनेमात तिला शेवटचे पाहिले गेले. 6 / 8रिया खरी प्रसिद्धीझोतात आली ती एका MMS व्हिडिओमुळे. तिचा आणि अश्मित पटेलचा एक व्हिडिओ ऑनलाईन लीक झाला होता ज्यात ते दोघे इंटिमेट झाले होते. यानंतर रियाचं करिअरच बर्बाद झालं. तसंच तिचं आणि अश्मितचं ब्रेकअपही झालं.7 / 8रिया राजघराण्यात जन्माला आली आहे. तिचे वडील भारत देव वर्मा हे त्रिपुराच्या राजघराण्यातून आले आहेत. वडिलांची आई इला देवी या कूछ बिहारीच्या राजकन्या होत्या . तर त्यांची छोटी बहीण गायत्री देवी जयपूरच्या महाराणी होत्या. तर तिची पणजी या बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या एकुलत्या एक कन्या होत्या.8 / 8२०१७ मध्ये रियाने बॉयफ्रेंड शिवम तिवारीसह लग्नगाठ बांधली. नवऱ्यासोबत ती अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.